Mukta Barve Know About Actress Mukta Barve Childhood And Films

[ad_1]

Mukta Barve: मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. मुक्ताच्या नव्या प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. जाणून घेऊयात मुक्ताच्या बालपणीबद्दल आणि तिच्या मालिका आणि चित्रपटांबद्दल…

मुक्ता बर्वेनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, ‘चिंचवडमध्ये माझं बालपण गेलं. कमी बोलणारी मुलगी मी होते. लहानपणी मला मोजके मित्र मैत्री होते. मला लहानपणी आर्ट आणि क्राफ्ट करायला आवडायचं.’

मुक्ता बर्वेनं तिच्या शिक्षणाबद्दल सांगितलं, ‘मी ललित कला केंद्रामध्ये शिक्षण घेतलं. ललित कला केंद्रामध्ये एका वर्गात बसून अनेक महाविद्यालयांचे शिक्षण शिकण्याची संधी मिळत होती. तिथे मला गिरिश कर्नाड, जब्बार पटेल, विजया मेहता यांसारखे दिग्गज लोक भेटले. माझ्या कुटुंबानी मला नेहमीच प्रत्येक गोष्टीत खूप सपोर्ट केला आहे. ‘

मुक्तानं लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. तिनं ‘‘रुसू नका फुगू नका‘’ या  नाटकात लहानपणी काम केलं होतं. तसेच तिनं आम्हाला वेगळे व्हायचंय, देहभान,फायनल ड्राफ्ट  या नाटकांमध्ये मुक्तानं काम केलं आहे.


मुक्तानं या चित्रपटांमध्ये केलं काम

तसेच  पिंपळपान,बंधन,  आभाळमाया,श्रीयुत गंगाधर टिपरे , इंद्रधनुष्य,अग्निहोत्र  या मालिकांमध्ये मुक्तानं काम केलं. जोगवा आणि मुंबई- पुणे- मुंबई या चित्रपटांमधील मुक्ताच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. मुंबई- पुणे– मुंबई या चित्रपटामधील मुक्ता आणि स्वप्निल जोशी यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. चकवा, मंगलाष्टक वन्स मोअर, लग्न पहावे करून, डबलसीट,”हायवे- एक सेल्फी आरपार” या चित्रपटांमध्ये देखील मुक्तानं काम केलं आहे.  गेल्या वर्षी मुक्ताचा वाय/ Y हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आलाय या चित्रपटामधील मुक्ताच्या अभिनयाचं आणि चित्रपटाच्या कथानकाचं अनेकांनी कौतुक केलं.

मुक्ता सध्या  चारचौघी या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  ‘चारचौघी’ या नाटकात मुक्तासोबतच रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर या कलाकारांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. या नाटकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Mukta Barve : मुक्ता बर्वे म्हणतेय,”दुसऱ्याचं प्रेम मिळविण्यापेक्षा स्वतःचं…”; चाहते म्हणाले,”अगं तू वेडी आहेस का?”

 

 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *