Mumbai IIT student job Placement News Only 6.1 percent students are waiting for job in Mumbai IIT

[ad_1]

Mumbai IIT News : मुंबई आयआयटीमध्ये (Mumbai IIT) फक्त 6.1 टक्के विद्यार्थी नोकरीच्या (Job) प्रतीक्षेत आहेत. याबाबतची माहिती मुंबई आयआयटीने दिली आहे. प्लेसमेंट (Placement) संदर्भात मुंबई IIT ने एका सर्वेचा दाखला देत स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबई IIT मध्ये यंदाच्या वर्षी 36 टक्के विद्यार्थ्यांना आयआयटी प्लेसमेंट मध्ये नोकरी  न मिळाल्याच्या बातम्या  प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर IIT ने स्पष्टीकरणं दिलं आहे.

57.1 टक्के विद्यार्थ्यांना मुंबई आयडीच्या प्लेसमेंट कॅम्पसमध्ये नोकरी मिळाली 

अनेक ठिकाणी मुंबई IIT मध्ये यंदाच्या वर्षी 36 टक्के विद्यार्थ्यांना आयआयटी प्लेसमेंट मध्ये नोकरी न मिळाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर  मुंबई IIT स्पष्टीकरणं दिलं आहे. मुंबई आयआयटीने 2022-23  च्या एका सर्वेचा दाखला देत स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबई आयआयटीच्या या   2022-23  सर्वेनुसार फक्त 6.1 टक्के विद्यार्थी हे जॉबच्या शोधात असल्याची माहिती  मुंबई IIT दिली आहे. यामध्ये एकूण 57.1 टक्के विद्यार्थ्यांना मुंबई आयडीच्या प्लेसमेंट कॅम्पसमध्ये नोकरी मिळाली आहे. तर उर्वरित टक्केवारी पाहता  12.2 टक्के विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी  प्लेसमेंट मध्ये नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न केलेला नाही. तर 10.3 टक्के विद्यार्थ्यांनी मुंबई आयआयटीच्या बाहेर नोकरी मिळवली आहे. तर 8.3 टक्के विद्यार्थ्यांना पब्लिक सर्विसेसमध्ये जाण्याचा विचार केला आहे. 

4.3 टक्के विद्यार्थ्यांनी अद्यापही  विचार केलेला नाही 

मुंबई IIT ने दिलेल्या माहितीनुसार, 4.3 टक्के विद्यार्थ्यांनी अद्यापही  विचार केलेला नाही 
तर 6.1 टक्के विद्यार्थी हे नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. तर 1.6 टक्के विद्यार्थ्यांनी नोकरी न करता  स्टार्टअप सुरू न करण्याचा विचार केला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

IIT उत्तीर्ण तरुणाने सरकारी नोकरीऐवजी केली शेतीची निवड , आज वर्षाला कमवतोय 10 लाख रुपये 

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *