[ad_1]
BEST Strike : मुंबईची (Mumbai) दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या (Best Bus) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संपाचे (BEST Workers Strike) हत्यार उपसले आहे. सुमारे नऊ हजार कंत्राटी कर्मचारी बेस्टच्या बसचे वाहक आणि चालक असल्याने याचा मोठा फटाक बेस्टला आणि मुंबईकरांना बसत आहे.
आझाद मैदानात (Azad Maidan) बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी समाजसेविका प्रज्ञा खजूरकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी 1 तारखेपासून घाटकोपर आगरमधील 280 कंत्राटी कर्मचारी संपावर जात आजाद मैदान गाठले होते. या संपाची या तीव्रता वाढत गेली आणि कंत्राटी तत्वावर असलेल्या मुंबईमधील विविध आगारातील कंत्राटी कर्मचारी संपावर गेले आहेत.
जवळजवळ सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला आहे. जोपर्यंत आपल्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोणीही आगारात जाऊ नये अशी भूमिका या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. मोठ्या संख्येने हे कर्मचारी आझाद मैदानात दाखल होत आहेत. आज बेस्टच्या काही अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला आहे.
अशा स्थितीमध्ये बेस्ट प्रशासन आता बेस्टच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर ताण वाढवत असल्याचे दिसत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा संप सुरुच राहिल, अशी भूमिका या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतल्याने मुंबईकरांना मात्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
हा संप आता अनेक आगारांमध्ये पसरला आहे. देवनार, मुलुंड, मुंबई सेंट्रल, मागाठाणे, गोराई, शिवाजी नगर, बॅकबे, प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज आणि मजास या आगारांमधील कंत्राटी चालकही संपावर गेले आहेत.
बेस्टमध्ये कंत्राटी बसेसचा समावेश का?
बेस्ट प्रशासन आर्थिक अडचणीत सापडलं आहे. खर्च कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने आपल्या ताफ्यात कंत्राटी पद्धतीने बस ताफ्यात घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी निविदा काढण्यात आल्या. बस आणि चालक यांची नियुक्ती कंत्राटदाराकडून करण्यात येते. तर, निविदेत निश्चित केलेली रक्कम कंत्राटदाराला बेस्टला द्यावी लागते. यामुळे नवीन बस खरेदी आणि नवीन चालकांची नियुक्ती बेस्टला करावी लागत नाही. त्याच्या परिणामी बेस्टची काही प्रमाणात बचत झाली. कंत्राटदाराकडून बेस्टच्या मिनी एसी बस, एसी बस, इलेक्ट्रीक बस चालवण्यात येते. मुंबईत विविध आगारात वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून सेवा पुरवण्यात येते.
हेही वाचा
[ad_2]
Source link