Ncp Mla Nawab Malik Can Join Ajit Pawar Led NCP Faction Discussion Began Due To Protest Message From Ajit Pawar Faction

[ad_1]

मुंबई : वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नवाब मलिक हे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्त्वातील गटात सामील होण्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार गटाच्या कार्यालयाकडून उद्या मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नवाब मलिक हे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर नवाब मलिक घरी परतले होते.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. यामध्ये अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर आदींचा समावेश होता. तर, शरद पवार गटांकडून सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, एकनाथ खडसे आदी नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे नवाब मलिक यांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही गटाचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली होती. 

चर्चा कशामुळे सुरू?

अजित पवार गटात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच विद्येची देवता कोण, यावरून वक्तव्य केले होते. ज्यांची विद्येची देवता म्हणून पूजा करतो, अशांनी किती शाळा सुरू केल्या, असा सवाल भुजबळ यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात केला होता. त्याशिवाय, ब्राह्मण घरांमधील मुलांची नावे शिवाजी, संभाजी नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर परशूराम सेनेचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी भुजबळांविरोधात वादग्रस्त आवाहन केले. भुजबळ यांना मारहाण करणाऱ्याला बक्षीस देणार असल्याचे देशपांडे यांनी म्हटले होते. आता, या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पडताना दिसत आहे. 

उद्या, मंगळवारी, 22 ऑगस्ट रोजी अजित पवार गटाकडून विश्वजीत देशपांडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता सेल टॅक्स कार्यालय माझगाव येथे आंदोलन होणार असल्याची माहिती अजित पवार गटाने दिली. जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांच्यावतीने आंदोलनाची घोषणा करण्यात आली. मात्र, हे आंदोलन पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नवाब मलिक हे अजित पवार गटात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

मलिक कुटुंबीयांनी काय म्हटले?

अजित पवार यांच्या गटाने नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनात आंदोलन होणार असल्याची माहिती दिली असली तरी मलिक कुटुंबीय, अथवा नवाब मलिक यांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही. नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर झाला आहे. मलिक हे प्रकृतीवरील उपचाराला प्राधान्य देत असून त्यांनी कोणत्या गटात जाणार, याबाबत भाष्य करणार नसल्याचे कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. याआधीदेखील मलिक हे सध्या प्रकृतीवरील उपचाराला प्राधान्य देणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले होते. 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *