NIA Raids In Kolhapur But Police Unaware What Did SP Mahendra Pandit Say On The Nia Raid

[ad_1]

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यात पुन्हा एकदा एनआयएकडून छापेमारी करण्यात आली आहे. दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) एनआयएकडून शनिवारी (12 ऑगस्ट) कोल्हापूर शहरासह इचलकरंजी आणि हुपरी येथे छापे टाकून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. एनआयएकडून ही कारवाई सुरु असताना स्थानिक पोलिसांना याबाबत कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. 

या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पोलिस (Kolhapur Police) अधीक्षक महेंद्र पंडित यांनी माहिती दिली आहे. त्यांनी बोलताना सांगितले की, NIA ही राष्ट्रीय तपास यंत्रणा आहे. जर त्यांना स्थानिक पोलिसांची गरज भासली तरच ते पोलिसांना सांगतात. देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने प्रचंड गुप्तता पाळली जाते. NIA च्या कामात कोणीह अडथळा आणू नये, यासाठी स्थानिक पोलिसांकडून काळजी घेतली जाते. मात्र, कोल्हापुरात तसा अडथळा कुठेही कोल्हापुरात आला नाही. 

त्यामुळे कोल्हापुरात माॅक ड्रिल घेण्यात आले 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोल्हापूर रेल्वे स्थानकात कोल्हापूर पोलिसांकडून माॅकड्रील घेण्यात आले होते. या माॅक ड्रिलवरून महेंद्र पंडित यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, मिरजला रेल्वे स्थानकाच्या बाबतीत एक कॉल आला होता, त्यामुळे आम्ही कोल्हापूर रेल्वे स्थानकावर मॉकड्रील घेतलं होतं. अंबाबाई मंदिराची सुरक्षा देखील योग्य पद्धतीने ठेवली आहे. आगामी काही महिन्यात मोठ्या प्रमाणात सण उत्सव आहेत, त्यामुळे अंबाबाई मंदिरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली तर तातडीने चौकशी करण्याचे सूचना दिल्या आहेत.

अत्यंत गोपनीयरित्या कारवाई 

एनआयएच्या रेकॉर्डवरील दोन दहशतवादी पुणे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर दहशतवाद्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील वावर तपासातून समोर येत आहे. एनआयएच्या पथकांनी शनिवारी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील १४ ठिकाणे छापे टाकले. महाराष्ट्रात कोल्हापूर आणि नाशिक येथे टाकलेल्या छाप्यांमधून काही महत्त्वाची माहिती पथकांच्या लागली आहे. यात संशयास्पद कागदपत्रे, लोखंडी शस्त्रे यासह मोबाइल, लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून तीन संशयितांना पथकाने ताब्यात घेतले. यातील दोघे 30 ते 35  वयोगटातील आहेत, तर एक अंदाजे 45 वर्ष वयाचा आहे. ही कारवाई अत्यंत गोपनीयरित्या करण्यात आली. 

दहशतवाद, हिंसाचार कृत्यांच्या माध्यमातून देशात 2047 पर्यंत इस्लामिक खिलाफत आणण्याचा ‘पीएफआय’चा उद्देश आहे. यासाठी युवकांची दिशाभूल करून त्यांना शस्त्रप्रशिक्षण दिले जात आहे. ‘पीएफआय’चे हे प्रयत्न रोखण्यासाठी ‘एनआयए’ कार्यरत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *