Nifty Close Above 19600 Level Sensex Rises 149 Points Oil & Gas Metals Stock Rise Up

[ad_1]

Sensex Closing Bell :  संपूर्ण दिवसभर शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. मात्र, व्यवहाराच्या अखेरच्या एका तासात गुंतवणूकदारांकडून खरेदीचा उत्साह दिसल्याने बाजारात तेजी दिसून आली. दिवसभरातील नीचांकापासून सेन्सेक्सने (Sensex) उसळी घेतली. व्यवहार थांबताना निर्देशांक तेजीसह बंद झाले. आज दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 149 अंकांच्या तेजीसह 65,995 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty 50) 62 अंकांनी वधारून 19,632 अंकांवर स्थिरावला. 

कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?

आज दिवसभरातील व्यवहारात ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, मीडिया, एनर्जी, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थकेअर आणि ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमधील  शेअर्स तेजीसह बंद झाले. तर, बँकिंग, रिअल इस्टेट सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये पुन्हा एकदा चांगलीच तेजी दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी 17 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 34 कंपन्यांचे शेअर्स दर वधारले. 













इंडेक्‍स  किती अंकांवर बंद दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 65,995.81 66,066.01 65,444.38 0.23%
BSE SmallCap 35,450.37 35,486.60 35,275.27 0.57%
India VIX 11.14 11.77 10.49 -1.63%
NIFTY Midcap 100 38,037.00 38,058.40 37,756.40 0.33%
NIFTY Smallcap 100 11,825.15 11,839.90 11,765.40 0.59%
NIfty smallcap 50 5,396.50 5,401.55 5,347.25 1.12%
Nifty 100 19,554.75 19,565.70 19,403.05 0.29%
Nifty 200 10,401.60 10,407.20 10,321.95 0.30%
Nifty 50 19,632.55 19,645.50 19,467.50 0.32%

 

गुंतवणूकदारांचा फायदा

मुंबई शेअर बाजारावर (BSE) सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 9 ऑगस्ट रोजी वाढून 306.32 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मंगळवारी हे बाजार भांडवल 305.35 लाख कोटी रुपयांच्या घरात होते. आज दिवसभरातील व्यवहारात सुमारे 97 हजार कोटी रुपयांनी बाजार भांडवल वाढले आहे.

2028 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी

मुंबई शेअर बाजारामध्ये (BSE) आजच्या व्यवहारात बहुतांशी शेअर्स तेजीसह बंद झाले. आज एकूण 3,743 कंपन्यांच्या शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 2,028 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, 1,560  कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 155 कंपन्यांच्या शेअर्स कोणत्याही चढ-उताराशिवाय फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 238 शेअर्सने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. त्याच वेळी, 27 शेअर्सने  52 आठवड्यांच्या नीचांक गाठला. 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *