No Confidence Motion Debate PM Narendra Modi Will Reply To The No-confidence Motion Today In Lok Sabha

[ad_1]

No Confidence Motion Debate : लोकसभेत आज (10 ऑगस्ट) अविश्वास प्रस्तावावर (No Confidence Motion) चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज अविश्वास प्रस्तावावर उत्तर देणार आहेत. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत 8 ऑगस्टपासून चर्चा सुरु झाली. काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरुवात करताना विरोधकांचा अजेंडा मणिपूर (Manipur Violence) असेल, असं स्पष्ट केलं होतं. तर बुधवारी (9 ऑगस्ट) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन भाजप आणि पंतप्रधानांवर आक्रमकपणे हल्लाबोल केला. त्याला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जोरदार युक्तिवाद केला. आजही दोन्ही बाजूचे खासदार अविश्वास ठरावावरील चर्चेत सहभागी होणार आहेत. शेवटी, पंतप्रधान मोदी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील. 2018 मध्येही मोदींना अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावं लागलं होतं. तेव्हाही विरोधकांकडे संख्याबळ नव्हतं. आजही मतदान झाल्यास अविश्वास ठराव फेटाळला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधकांचं राजकारण : अमित शाह

लोकसभेत सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत बोलताना, गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरशी संबंधित घडामोडी आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप करत शाह म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूर दौऱ्यात रस्त्यावरुन जाण्याचा आग्रह धरला, मात्र ते शांतते हवाई मार्गाने जाऊ शकले असते. अमित शाह म्हणाले की, ‘ही वेळ राजकारण करण्याची नाही, ही बाब विरोधकांनी समजून घेतली पाहिजे. जनतेला सर्व काही कळतं आणि जनता सर्वकाही जाणते हे त्यांना कळायला हवं.

मणिपूरमध्ये मोदी सरकारने भारताची हत्या केली : राहुल गांधी

अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत. कारण तुमच्यासाठी मणिपूर भारतात नाही. मणिपूरमध्ये भारताची हत्या झाली. मणिपूरमध्ये हिंदुस्थानची हत्या झाली आहे. तुम्ही मणिपूरचे दोन भाग केलंय, तोडलंय, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर थेट हल्लाबोल केला आहे. 

हेही वाचा

Rahul Gandhi : भाषण राहुल गांधींचे पण संसद टीव्हीवर दिसले लोकसभा अध्यक्ष; काँग्रेसने उपस्थित केले प्रश्न

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाने गदारोळ केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, मणिपूरमध्ये सात दशकात जे काही घडलं त्याला काँग्रेस जबाबदार आहे. राहुल गांधी यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे.

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *