On Sridevi 60 Th Birth Anniversary Jahnavi Kapoor Post A Sridevis Throwback Photo On Her Instagram Marathi News

[ad_1]

Sridevi Throwback Photo : श्रीदेवी यांची आज 60 वी जयंती. आज त्या निमित्तानेच जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अनेक लोक भावूक झाले आहेत. अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. जान्हवीने सोशल मीडियावर श्रीदेवीचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आणि त्यासोबत एक भावनिक नोटही लिहिली.

काय आहे पोस्ट

जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर श्रीदेवींचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये श्रीदेवी गुलाबी टॉपसह काळ्या रंगाची जीन्स घालून आईच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. हा फोटो पाहून असे वाटते की, फोटो कोणत्यातरी चित्रटाच्या सेटवरचा आहे. हा फोटो शेअर करत तिने खाली एक मोठी नोट लिहिली आहे. ज्यात ती म्हणते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मम्मा. तु तुझ्या आईसोबत अनेक ठिकाणी जायची. तिची मांडी ही तुझ्या सगळ्यात आवडत्या
जागांपैकी एक. आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी आज मी चित्रपटाच्या सेटवर आहे आणि मला ही तु माझ्याजवळ असावी असे वाटत आहे. मला कायमच तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दलचा असणारा अभिमान पाहायचा होता. मी आत्ता जे
काही प्रयत्न करत आहे, ते पाहून तुला खूप आनंद झाला असता. मम्मा मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तु माझ्यासाठी या जगातील सर्वात खास स्त्री आहेस. मला माहित आहे की, तू कायम आमच्यासोबतच असणार आहेस.”


काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूरचा बवाल चित्रपट Ott Platform वर रिलीज झाला होता. ज्यात तिचा अभिनय अतिशय अप्रतिम होता.  वरुण आणि जान्हवी यांची रोमँटिक केमेस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली.  या चित्रपटाचं दिग्दर्शन
 नितेश तिवारी यांनी केलं आहे. साजिद नाडियादवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. नाट्य, रोमान्स आणि इमोशन्स या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळले. मिथुन, तनिष्क बागची आणि आकाशदीप सेनगुप्ताने या 
सिनेमातील गाणी गायली आहेत. तर जान्हवीनं गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, दोस्ताना 2, रूही यांसारख्या चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे. तिच्या मिली या चित्रपटातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. ‘दंगल’ आणि ‘छिछोरे’ सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलेल्या नितेश तिवारीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. काही दिवसांपूर्वी दुबईत या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. 

 

इतर महत्वाच्या बातम्या

Pushpa 2 : पुष्पानं प्रदर्शनापूर्वीच रचला मोठा विक्रम , पोस्टरला इंस्टाग्रामवर मिळाले सर्वात जास्त लाईक्स

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *