Pepperfry Co-founder CEO Ambareesh Murty Dies Due To Cardiac Arrest Who Is Ambareesh Murty

[ad_1]

Pepperfry Co-founder CEO : प्रसिद्ध ऑनलाईन फर्निचर कंपनीची पेपरफ्राय (Pepperfry) चे फाऊंडर आणि सीईओ अंबरीश मूर्ती (Ambareesh Murty) यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 51 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लेहमध्ये असताना अंबरीश मूर्ती यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अंबरीश मूर्ती यांनी आशिष शाह यांच्यासोबत मिळून 2012 साली ‘पेपरफ्राय’ (Pepperfry) या ऑनलाईन फर्निचर कंपनीची (furniture and Home Decor) स्थापना केली होती. अंबरीश मूर्ती IIM (Indian Institutes of Management) चे विद्यार्थी होते.

पेपरफ्रायचे सीईओ अंबरीश मूर्ती यांचं निधन

पेपरफ्राय (Pepperfry) ऑनलाइन फर्निचर स्टोअरचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अंबरीश मूर्ती यांचं निधन झालं आहे. पेपरफ्रायचे दुसरे सह-संस्थापक आशिष शाह यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. आशिष शाह यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की, माझे मित्र, मेन्टॉर आणि भाऊ अंबरीश मूर्ती यांचं निधन झालं आहे. काल रात्री अंबरीश लडाखमध्ये होता, जिथे त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.’

1196 मध्ये IIM मधून MBA शिक्षण

अंबरीश मूर्ती यांनी 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून इंजिनीअरिंग केलं. यानंतर त्यांनी 1996 मध्ये आयआयएम (IIM) कोलकाता येथून एमबीए (MBA) पूर्ण केले. त्यानंतर ते कॅडबरी कंपनीमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झाले. कंपनीने त्यांना एरिया सेल्स मॅनेजर म्हणून केरळला पाठवले. 2001 मध्ये सुमारे 5 वर्षांनी त्यांनी कॅडबरी कंपनी सोडली.

पहिल्या प्रयत्नात अपयश

त्यानंतर अंबरीश मूर्ती 2 वर्षांसाठी ICICI प्रुडेन्शियल AMC मध्ये म्युच्युअल फंड प्रोडक्ट लाँच करायला शिकले. 2003 मध्ये, त्यांनी आर्थिक प्रशिक्षण उपक्रम, ओरिजिन रिसोर्स सुरू करण्यासाठी नोकरी सोडली. पण त्यात त्यांना फारसं यश मिळालं नाही आणि 2005 मध्ये ब्रिटानियामध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून कॉर्पोरेट जगतात परतलं.

स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय

7 महिन्यांतच ते eBay India मध्ये रुजू झाले आणि दोन वर्षांत ते भारत, फिलीपिन्स आणि मलेशियाचे देश प्रमुख झाले. भारतातील ई-कॉमर्स व्यवसाय झपाट्याने वाढणार असल्याची त्यांना कल्पना होती. पण eBay ला भारतीय व्यवसायात गुंतवणूक करायची नव्हती, म्हणून त्यांनी स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला.

2012 मध्ये स्वत:ची कंपनी

अंबरीश मूर्ती यांनी 2012 मध्ये आशिष शाह यांच्यासोबत पेपरफ्राय या फर्निचर आणि होम डेकोरसाठीच्या एक ई-कॉमर्स कंपनीची स्थापना केली. हा व्यवसाय आणि प्रयत्न सफल होईल, याची त्यांनाही खात्री नव्हती. पण, वर्षभरात फर्निचर आणि होम डेकोर व्यवसायात त्यांनी चांगली पकड बनवली.

 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *