PM Modi Pune Visit Prime Minister Or Crime Minister Opponents Insist On Agitation To Protest Against Modi

[ad_1]

 PM Modi Pune visit: लोकमान्य टिळक पुरस्काराने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान (PM Modi Pune visit) होणार आहे. मात्र हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देऊ नये, असा विरोध करत महाविकास आघाडी पक्ष तसेच समविचारी संस्थांकडून केला जात आहे. मोदी गो बॅक अशा घोषणा दिल्या जात आहे.  पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरापासून 200 मीटर अंतरावर निषेध व्यक्त केला जात आहे. अलका टॉकीज चौक आणि मंडईतून विरोधक निषेध व्यक्त करत आहेत. प्राईम मिनिस्टर आहेत की क्राईम मिनिस्टर आहेत ? असे घेऊन विरोधकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात देशभरातून आक्रोश केला जात आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये जाऊन तिथे पाहणी करावी, अशी मागणी यांच्याकडून केली जात आहे. दरम्यान कालच पुणे पोलीसांकडून विरोधी पक्षातीला अनेकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र तरी देखील विरोधक आंदोलनावर ठाम आहेत. काळे झेंडे आणि काळे कपडे घालून निषेध केला जात आहे.

आंदोलन करणारच- प्रशांत जगताप

पुणे पोलीस पंतप्रधान कार्यालयाच्या किंवा केंद्र सरकारच्या अंडर प्रेशन आलेले आहेत. पंतप्रधानांच्या विरोधात आंदोलन कोणी करू नये, असा पुणे पोलीसांचा प्रयत्न आहे. मात्र आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत. निषेध व्यक्त करून आणि आंदोनल करून आम्ही त्यांचे पुण्यात स्वागत केले जाईल. मणिपूर जळत असताना, तेथील महिलांवर अत्याचार होत असताना, त्यांची सुरक्षा करण्याऐवजी मोदींना पुरस्कार महत्वाचा वाटत असेल. तर या पंतप्रधानांना निषेध व्यक्त करून आणि घोषणा ऐकूनच पुढे सोडावे लागणार आहे, असं मत पुणे राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलं आहे.

हीच हूकुमशाहीची सुरुवात- कुमार सप्तर्षी

लोकमान्य टिळक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काहीही संबंध नाही. तरीही त्यांना पुरस्कार देण्यात येत आहे. मोदी लोकशाही पाळत नाही. लोकसभेत येत नाहीत. बोलतदेखील नाही. मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. त्यावर मोदी काही बोलले नाहीत. असं चित्र असताना पुरस्कार स्विकारत असतील तर त्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. या आंदोलानाच्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हेच चित्र हुकुमशाहीची सुरुवात असल्याचं दिसत असल्याचं कुमार सप्तर्षी यांनी म्हटलंय.

हेही वाचा-

PM Modi Pune visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यनगरीत दाखल; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मोदींचं स्वागत

 

 

 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *