Pm Narendra Modi Won No Cofidence Motion In Parliament Session Marathi Update News 

[ad_1]

PM Narendra Modi Speech On No Confidence Motion : विरोधकांनी संसदेत आणलेला अविश्वास प्रस्ताव मोदी सरकारने जिंकला. विरोधकांनी सभात्याग केल्यामुळे हा प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. 

गेल्या तीन दिवसांपासून लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. पण मतदानाच्या आधी, मोदींच्या मणिपूरच्या भाषणाच्या आधीच विरोधकांनी सभात्याग केला. नंतर आवाजी मतदानाने मतदान घेण्यात आलं असून त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारचा विजय झाला आहे. 

आज मतदानाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करताना विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव हा भाजपसाठी शुभ संकेत असतो, त्यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप विक्रमी जागा मिळवून सत्तेत येणार असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. 

मणिपूरमध्ये आज जी काही समस्या आहे ती काँग्रेसच्या काळात निर्माण झाल्याची टीका पंतप्रधानांनी केली. विरोधक मणिपूरच्या मुद्द्यावरून राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ईशान्य भारत आमच्या काळजाचा तुकडा असून त्याचा विकास करणे हेच ध्येय असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. 

काँग्रेसने ईशान्य भारताकडे नेहमीच दुर्लक्ष केलं असून आमच्यामुळे पहिल्यांदाच ईशान्य भारताचा विकास होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

असं आहे लोकसभा संख्याबळ –

NDA – 

भाजप – 301
शिवसेना (शिंदे गट) – 13
एलजेपी – 06
अपना दल (सोनेलाल) – 02
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 01
AIADMK – 01
नॅशनल पिपल्स पार्टी – 01
नॅशनल डेमोक्रेटीक पिपल्स पार्टी – 01
नागा पिपल्स फ्रंट – 01

एकुण – 327
———–

INDIA –

काँग्रेस – 51
डीएमके – 24
टीएमसी – 23
जेडीयु – 16
शिवसेना (ठाकरे गट) – 06
राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 04
सीपीआयएम – 03
समाजवादी पार्टी – 03
नॅशनल काँन्फंरंन्स – 03
सीपीआय – 02
आप – 01 (निलंबीत केल आहे)
झारखंड मुक्ती मोर्चा – 01
केरळ काँग्रेस – 01
आरएसपी- 01
इंडीयन युनियन मुस्लिम लिग – 03

एकुण – 142

भूमिका जाहीर नाही – 

शिरोमनी अकाली दल – 02
सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा – 01
एमआयएम – 02
बीएसपी – 09
बीआरएस – 09 (INDIA च्या अविश्वास प्रस्तावाला पाठींबा दिला आहे)
मिजो नॅशनल फ्रंट – 01 (एनडीएचा भाग आहे, पण आज NAD च्या विरोधात)
वायएसआर काँग्रेस – 22 (एनडीएचा भाग नाही मात्र आजच्या अविश्वास ठरावाला विरोध)
बीजेडी – 12  (एनडीएचा भाग नाही मात्र आजच्या अविश्वास ठरावाला विरोध)
टीडीपी – 03
जेडीएस (S) – 01
अपक्ष – 03
AJSU – 01
AIUDF – 01
राष्ट्रीय लोकतांत्रीक पार्टी (RLP) – 01 
अकाली दल (मान) – 01
व्हिसीके – 01

एकुण – 70

लोकसभा एकुण संख्याबळ – 543
NDA – 327
INDAIA – 142
इतर – 70
रिक्त – 04

ही बातमी वाचा: 

 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *