Pope Francis Says Catholic Church Open To LGBT People But One Condition

[ad_1]

Pope Francis about LGBT : ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी एलजीबीटी समुदायाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं आहे की, कॅथलिक चर्च LGBT समुदायासाठी खुले आहेत. यावेळी त्यांनी म्हटलं की, अध्यात्माच्या मार्गावर सर्वांच्या सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे. पण, यासाठीचे दिलेले काही नियम पाळावे लागतील. पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं की, नियमानुसार LGBT समुदायाचे लोक काही विधींमध्ये भाग घेऊ शकत नाही, पण याचा अर्थ त्यांच्यावर बंदी आहे, असा होत नाही.

पोप फ्रान्सिस यांचं मोठं वक्तव्य

पोप फ्रान्सिस पोर्तुगालमध्ये आयोजित जागतिक युवा दिन कॅथोलिक महोत्सवात सहभागी झाले होते. पोर्तुगालहून रोमला परतत असताना पत्रकारांशी संवाद साधताना पोप फ्रान्सिस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एलजीबीटी समुदायाबाबत बोलताना ते म्हणाले की, कॅथलिक चर्चमध्ये एलजीबीटी समुदायाला परवानगी आहे. पण, त्यांना काही नियम पाळावे लागतील.

LGBT समुदायासाठी चर्च खुले पण…

पोप फ्रान्सिस यांननी म्हटलं की, चर्चमध्ये जीवन नियंत्रित करण्यासाठी काही नियम आहे आणि त्यांचं पालन करणं गरजेचं आहे. पोर्तुगालच्या भेटीदरम्यान त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले की चर्च सर्वांसाठी, सर्वांसाठी खुले आहे, परंतु महिला आणि समलैंगिकांना इतरांपेक्षा जास्त अधिकार मिळत नाहीत हे विसंगत नाही का, असा प्रश्न एका पत्रकाराने पोप फ्रान्सिस यांना विचारला होता, त्यावर उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *