[ad_1]
Prabhas Bald Look : ‘बाहुबली’ आणि ‘साहो’ सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंनजन करणारा प्रभास (Prabhas) सध्या त्याच्या एका फोटोमुळे चर्चेत आहे. प्रभासचा डोक्यावर केस नसलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अभिनेता एका महिलेसोबत दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर आदिपुरुष’ फ्लॉप झाल्याने प्रभासच्या डोक्यावरचे केस गेले? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
प्रभासच्या व्हायरल फोटोमागील सत्य काय?
प्रभासचा डोक्यावर केस नसलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहते हैराण झाले आहेत. प्रभास कधीही न दिसलेल्या लूकमध्ये दिसत असल्याने चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. पण खरं तर, प्रभासने टक्कल केलेलं नाही. तर फोटोशॉप केलेला त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
What happened to PRabhas ?
Why he’s look bald in this pic ?
#prabhas #salaar pic.twitter.com/qV5cDEWrHd— P∆BLO ™ (@BhAAi_007) August 21, 2023
प्रभासचे दोन सिनेमे फ्लॉप!
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये प्रभासची गणना होते. पण तरीही या सुपरस्टारचे दोन सिनेमे सुपरफ्लॉप ठरले आहेत. अभिनेत्याच्या ‘राधेश्याम’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 170 कोटींची कमाई केली. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘आदिपुरुष’ या सिनेमाने 225 कोटींची कमाई केली. हे दोन्ही बिग बजेट सिनेमे असून बॉक्स ऑफिसवर मात्र जादू दाखवण्यात कमी पडले.
प्रभासचे पूर्ण नाम ‘उप्पलपती वेंकट सूर्यनारायण प्रभास राजू’ असं आहे. पण जगभरात तो ‘प्रभास’ या नावानेच ओळखला जातो. हैदराबादमध्ये त्याचं आलिशान घर आहे. या घराची किंमत 65 कोटी रुपये आहे. ‘वर्शम’,’छत्रपती’,’बिल्ला’,’डार्लिंग’,मिस्टर परफेक्ट’ आणि ‘मिर्ची’ अशा अनेक सिनेमांत प्रभासच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे. अभिनेत्याकडे अनेक महागड्या गाड्यादेखील आहेत. प्रभासची नेटवर्थ 215 कोटींच्या आसपास आहे.
प्रभासचा ‘आदिपुरुष’ फ्लॉप झाला असला तरी अभिनेत्याच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. ‘आदिपुरुष’नंतर प्रभास आता ‘कल्कि 2898 AD’ या सिनेमात झळकणार आहे. नाग अश्विन या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. 600 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. या सिनेमात प्रभाससह दीपिका पादुकोण, कमल हासन आणि अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. प्रभासचा ‘सालार’ हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.
संबंधित बातम्या
Jawan Vs Salaar : शाहरुख खान अन् प्रभास आमने-सामने; ‘जवान’पेक्षा ‘सालार’ची अॅडव्हान्स बुकिंग सर्वाधिक
.
[ad_2]
Source link