Prajakta Mali And Sai Tamhankar Share Video From Maharashtrachi Hasyajatra Shooting Set

[ad_1]

Prajakta Mali: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. नुकताच अभिनेत्री प्राजक्ता माळीनं (Prajakta Mali) ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सेटवरील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. प्राजक्तानं शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. प्राजक्तानं या व्हिडीओला खास कॅप्शन देखील दिलं आहे.

प्राजक्तानं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सेटवरील व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘आणि काल शूटींगला सुरूवात झाली… खूप आवश्यक असणाऱ्या लाफ्टर थेरपीची सुरू झाली आहे.14 ॲागस्ट पासून सोम-गुरू रात्री 9 वाजता.’ प्रेक्षक ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या या नव्या पर्वाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

प्राजक्तानं शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘अरे वा म्हणजे आमचे आनंदाचे दिवस लवकरच येणार’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘माझा सर्वात आवडता कार्यक्रम’ प्राजक्तानं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सई ताम्हणकरनं पण एक व्हिडीओ शेअर करुन  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी हे देखील दिसत आहे. या व्हिडीओला सईनं कॅप्शन दिलं, ‘Back to MHJ’

काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’  या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या प्रोमोमध्ये दत्तु मोरे, ईशा डे, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौघुले आणि वनीता खरात हे कलाकार दिसले.

महाराष्ट्राची हास्यजत्रा’  (Maharashtrachi Hasyajatra)  या कार्यक्रमातील प्रियदर्शिनी इंदलकर, समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात हे कलाकार आपल्या विनोदीशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते.

संबंधित बातम्या

Maharashtrachi Hasyajatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; चाहते म्हणाले,”ओंकार भोजनेला परत आणा”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *