Prakash Raj Tweet After Getting Trolled Says Was Referring To A Joke Of Armstrong Times

Prakash Raj Tweet After Getting Trolled Says Was Referring To A Joke Of Armstrong Times

[ad_1]

Prakash Raj: अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. प्रकाश राज हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन विविध विषयांवर मतं मांडत असतात. नुकतेच प्रकाश राज यांनी एक ट्वीट शेअर केले. त्यांनी शेअर केलेल्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी या ट्वीटमध्ये प्रकाश राज यांना ट्रोल देखील केलं आहे.

प्रकाश राज यांचे ट्वीट

प्रकाश राज यांनी ट्विटरवर शर्ट आणि लुंगी घातलेल्या चहा विक्रेत्याची कार्टून इमेज शेअर केली. या फोटोला प्रकाश राज यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं,’चंद्राचे पहिले छायाचित्र विक्रम लँडरकडून येत आहे… व्वा… #justasking…’ या ट्वीटला नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर आता प्रकाश राज यांनी या ट्वीटबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

प्रकाश राज यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, ‘द्वेष करणाऱ्यांना फक्त द्वेषच दिसतो. मी आर्मस्ट्राँगच्या काळातील विनोदाचा संदर्भ देत होतो. आमच्या केरळ चायवालाबद्दल बोलत होतो. कोणता चायवाला ट्रोलर्सनी पाहिला? जर तुम्हाला विनोद कळत नसेल तर हा जोक तुमच्यासाठीच आहे. GROW UP’

प्रकाश राज हे विविध विषयांवरील मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी  द केरळ स्टोरी, द कश्मीर फाइल्स या चित्रपटांबाबत देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.

प्रकाश राज यांनी हिंदी तसेच तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी सिंघम या चित्रपटात साकरलेल्या जयकांत शिक्रे या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच त्यांनी वारिसू, केजीएफ, वॉन्टेड या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. नेटफ्लिक्सवरील ‘नवरस’  या चित्रपटात देखील त्यांनी काम केलं. प्रकाश यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सकतेने वाट बघत असतात. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

Prakash Raj: प्रकाश राज यांनी हिटलरसोबत केली नरेंद्र मोदी यांची तुलना? ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले, ‘इतिहासाची पुनरावृत्ती..’

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *