Pune Chandani CHowk News Dcm Devendra Fadnavis Comment On Ajit Pawar In Pune

[ad_1]

Devendra Fadnavis :  पुण्यावर प्रेम करणारा अजित पवार यांच्यासारखा नेता आमच्यासोबत असल्यामुळं विकासाला आणखी गती मिळेल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी केलं. चांदणी चौकातील (Chandani Chawk Flyover) नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. वाहतूक कोंडीत अडकून लोकांना दिवसा चांदण्या दिसायच्या म्हणून या चौकाला चांदणी चौक हे नाव पडले असे मला वाटत होते. पण अजित पवारांनी माझ्या ज्ञानात भर घातली. अजितदादांनी या चौकाला चांदणी चौक हे नाव का पडलं ते सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. 

पुणे हे विचारवंतांचे शहर आहे. इथे निर्णय घेणे सोपे नाही. एखाद्या प्रकल्पासाठी लोक तीन वेगवेगळ्या देशातील संस्थांचे रिपोर्ट आणतात. पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रोपेक्षा आधी सुरु झाले होते. मात्र  नागपूर मेट्रोचे काम आधी पूर्ण झाल्याचे फडणवीस म्हणाले. दरम्यान,गडकरी साहेबांचे पुण्यावर, राज्यावर असलेल्या प्रेमामुळं वेगवेगळे प्रकल्प होत आहेत, याचा आनंद असल्यचा फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवढ्या वेळा पुण्यात आले तेवढ्या वेळेस दुसरे कोणतेही पंतप्रधान पुण्यात कधी आले नाहीत. ते आणखीही पुण्यात येतील असे फडणवीस म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Ajit Pawar Chandani Chowk : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही दोघंही वेडे नाहीत, असं अजित पवार का म्हणाले?

 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *