Pune Crime News Gangster Enters Home And Rapes 16 Year Old Girl Incident In Khadki Area

[ad_1]

Pune Rape Case : पुण्यात गुन्हेगारी चांगलीच वाढताना दिसत (Pune Crime News) आहे. त्यातच (Pune Minor Girl Rape Case)  मागील काही दिवसांपासून पुण्यात मुलींवर अत्याचाराच्यादेखील घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच पुन्हा एकदा पुण्यात गुंडगिरी करणार्‍या आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंडाने जबरदस्तीने घरात शिरुन एका 16 वर्षांच्या युवतीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे शहरात मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करण्यात येत आहे. 

या संपूर्ण प्रकरणी पुण्यातील खडकी पोलिसांत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. यश धर्मेश कांबळे (वय 20), असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. हा प्रकार 18 मार्च पासून वारंवार सुरु होता. या प्रकरणी 16 वर्षीय मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला थेट अटक केली आहे 

घरात शिरुन लैंगिक अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि आरोपी हे एकाच परिसरात राहतात. मुलगी या 18 मार्च रोजी दुपारी घरात झोपली असताना कांबळे जबरदस्तीने आत आला. त्याने मुलीवर बलात्कार केला. बलात्कार  केल्यानंतरही तो वारंवार मुलीची छेड काढत होता. या प्रकाराला कंटाळून शेवटी या तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. यश कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

पुण्यात बलात्काराच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ

पुण्यात बलात्काराच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दोन सख्ख्या भावांनी अल्पवयीन मुलीवर सलग 15 दिवस लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. लैंगिक अत्याचार करुन मुलीला आईवडिलांना कोयत्यानं मारुन टाकण्याची धमकी दिली होती. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला गेला. पुण्यातील उरुळी कांचन परिसरात ही घटना घडली होती.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलीसांनी नराधम इरफान शेख आणि आयुब शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली होती. याच घटनेच्या विरोधात उरळी कांचनमध्ये बंदची हाकही दिली होती. मुलीची आई मंगळवारी (11 जुलै) रात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर आली होती. यावेळी मुलगी अभ्यास करत असलेल्या खोलीच्या बाहेर आयुब दिसला होता. तर मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडून आत पाहिल्यावर खोलीत इरफान दिसला. मुलीच्या आईला पाहून दोघांनीही पळ काढला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या :

Cross Border Marriage : सीमा आणि अंजूनंतर सीमेपलिकडची आणखी एक प्रेमकहाणी, जोधपूरमधील वकीलाचं पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन लग्न

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *