Rahul Gandhi Pays Tribute To His Father And Former Prime Minister Rajiv Gandhi On From Pangong In Ladakh

[ad_1]

Rajiv Gandhi Birth Anniversary: आज देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची जयंती आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लडाखमधील 14270 फूट उंचीवर असलेल्या पंगत्सो तलावाच्या काठावर त्यांचे वडील आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. एएनआयनं याबाबत माहिती दिली आहे. तसेच, व्हिडीओही ट्वीट केला आहे. जम्मू-काश्मीर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास रसूल वली यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, राजीव गांधींनी देशासाठी बलिदान दिलं. त्यांच्या स्मरणार्थ आम्ही इथे जमलो आहोत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या वडिलांचं स्मरण करताना राहुल गांधींनी लिहिलं की, “पप्पा, तुमच्या डोळ्यांत भारतासाठी जी स्वप्नं होती, ती या अनमोल आठवणींमधून दिसतायत. तुमची स्वप्न हाच माझा मार्ग आहे – प्रत्येक भारतीयाचा संघर्ष आणि स्वप्न समजून घेतोय, भारत मातेचा आवाज ऐकतोय.”

लडाखमधील लोकं आनंदी नाहीत : राहुल गांधी 

माजी पंतप्रधान राजीव गांधींना श्रद्धांजलीनंतर राहुल गांधी यांनी चीनवरही हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, इथे सगळे म्हणतायत की, चिनी सैन्य घुसले आहेत. पंतप्रधान म्हणतात की, “इथे कोणीच घुसखोरी केलेली नाही, मात्र पंतप्रधानांचा हा दावा खरा नाही. इथे कोणालाही विचाराल, तर सगळे तेच म्हणतील. भारत जोडो यात्रेदरम्यान आम्हाला इथे यायचं होतं, पण काही कारणांमुळे आम्ही येथे येऊ शकलो नाही.”

ते म्हणाले की, लडाखच्या लोकांच्या अनेक तक्रारी आहेत. लडाखला जो दर्जा देण्यात आला आहे, त्यामुळे लोक खूश नाहीत. लोकांना प्रतिनिधित्व हवंय. राज्य नोकरशाहीनं चालवू नये, ते जनतेच्या आवाजानं चालवलं पाहिजे, असं लोक म्हणत आहेत.

राहुल गांधी लडाखच्या दौऱ्यावर 

राहुल गांधी सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर आणि राज्याची केंद्रशासित प्रदेशात पुनर्रचना झाल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिला लडाख दौरा आहे. पुढच्या आठवड्यात ते कारगिलला जाणार आहेत. जिथे पुढच्या महिन्यात हिल कौन्सिलच्या निवडणुका होणार आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *