Raj Thackeray Reaction On Ajit Pawar And Sharad Pawar Secret Meeting In Pune Maharashtra

[ad_1]

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) गुप्त बैठकीनंतर महाविकासआघाडीत अस्वस्थता असल्याचं पाहायला मिळालं आहे. पवारांच्या बैठकीनंतर अनेक प्रतिक्रिया येत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक टीम आधी पाठवली दुसरी पण लवकरच जाईल, असे राज ठाकरे म्हणाले आहे.अजित पवार आणि शरद पवारांच्या गुप्त बैठकीनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

मनसेची वांद्रे एमआयजी क्लबमध्ये बैठक होणार आहे.  मनसे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.  सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेची ही महत्त्वाची बैठक आहे. राज ठाकरे म्हणाले, एक टीम आधी पाठवली आहे दुसरी पण लवकरच जाणार आहे. आतून सगळे  ऐकमेकांना मिळाले आहेत. 2014 सालापासून हे सर्व सुरु आहे. शरद पवार आणि अजित पवार यांना भेटण्याची जागा ‘चोर’डीया यांच्या घरीच मिळाली हे कमाल आहे. 

महापालिका निवडणुका होणार नाहीत : राज ठाकरे

राजकारणातील सध्याचा घोळ पाहता महापालिका निवडणुका होणार नाहीत, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. तसंच राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना लोकसभेच्या तयारीला लागा असे आदेश दिले आहेत.  राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात सध्या जो राजकीय घोळ झालाय त्यावरुन वाटत नाही पालिका निवडणुका आता लागतील असे वातावरण सध्या दिसत नाही. परंतु आता निवडणुका लोकसभेच्या लागतील. त्यासाठी आम्ही चाचपणी आणि तयारी सुरू केली आहे. 

पनवेलच्या मेळाव्यात खड्ड्यांविषयी सविस्तर बोलणार

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पनवेलच्या मेळाव्यात या विषयी सविस्तर बोलणार आहे.  मुंबई-गोवा महामार्गावरुन  मनसे आक्रमक झाली आहे. राज ठाकरेंच्या सभेनंतर मनसे खड्डे बुजवा मोहीम राबवणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आता मनसैनिक बुजवणार आहे. राज ठाकरेंच्या पनवेलमधील सभेनंतर खड्डे बुजवा मोहीम राबवण्यात येणार आहे.  

हे ही वाचा :

 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *