[ad_1]
Jailer Movie Marathi Actor : दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा रजनीकांतचा (Rajinikanth) ‘जेलर’ (Jailer) हा सिनेमा सध्या देशभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रजनीकांतचे चाहते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटीच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता ‘जेलर’ हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळाली आहेत. रजनीकांतच्या ‘जेलर’ या सिनेमात दोन मराठी कलाकारांनी काम केलं आहे.
मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) आणि गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni) या मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या दोन कलाकारांनी ‘जेलर’ या सिनेमात काम केलं आहे. गिरीश कुलकर्णी यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून त्यात त्यांनी रजनीसोबत एन्ट्री घेतली आहे. मकरंद देशपांडे यांनी एका गुंडाची भूमिका केली असून जेलमध्ये रजनी त्यांना धडा शिकवतो असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही कलाकारांवर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते कौतूकाचा वर्षाव करत आहेत.
सॅकनिल्क एंटरनेटमेंटच्या रिपोर्टनुसार, ‘जेलर’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 48 कोटींची कमाई करत सर्वांना आश्चर्यचकित केलं. दुसऱ्या दिवशी 25.75 कोटी आणि तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 35 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या तीन दिवसांत 109.10 कोटींचा टप्पा पार करत हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
नेल्सन दिलीपकुमारने ‘जेलर’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया आणि मल्याळम सुपरस्टार मोहनलाल मुख्य भूमिकेत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचा सध्या जगभरात बोलबाला आहे. सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. जेलर हा रजनिकांत यांचा 169 वा चित्रपट आहे. अॅक्शनचा तडका असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे.
‘जेलर’ या सिनेमातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या सिनेमातील ‘कावाला’ हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड झालं. या गाण्यावरील रिल्सचे व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांनी तसेच सेलिब्रिटींनी शेअर केले. या गाण्यामधील तमन्नाच्या डान्सला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळाली. तसेच रथामारे,जुजुबी ही गाणी देखील या चित्रपटांमध्ये आहेत.
संबंधित बातम्या
Jailer: रजनीकांत यांचा ‘जेलर’ झाला रिलीज; प्रेक्षकांचा थिएटरबाहेर जल्लोष, पोस्टरला केला दुधाचा अभिषेक, व्हिडीओ व्हायरल
.
[ad_2]
Source link