Ranji Trophy Mumbai : मुंबई रणजी विजयापासून केवळ पाच विकेट्स दूर : mh17news

[ad_1]

<p>मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेली रणजी करंडकाची फायनल चौथ्या दिवसअखेर यजमान मुंबईच्या बाजूनं झुकली आहे. या सामन्यात विदर्भानं चौथ्या दिवसअखेर पाच बाद २४८ धावांची मजल मारली आहे. त्यामुळं विदर्भासमोर विजयासाठी पाचव्या आणि अखेरच्या दिवशी २९० धावांचं कठीण आव्हान कायम आहे. त्या तुलनेत मुंबई विजयापासून केवळ पाच विकेट्स दूर आहे. रणजी करंडकाची ही फायनल अनिर्णीत राहिली तरी मुंबईला पहिल्या डावातल्या आघाडीच्या निकषावर रणजी करंडकाचा मान देण्यात येईल. या सामन्यात मुंबईनं विदर्भाला विजयासाठी ५३८ धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाच्या करुण नायर आणि कर्णधार अक्षय वाडकरनं झुंजार फलंदाजी केली. त्यांनी पाचव्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी रचली. करुण नायरनं ७४ धावांची, तर अक्षय वाडकरनं नाबाद ५६ धावांची खेळी उभारली.&nbsp;&nbsp;</p>

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *