Ratnagiri Crime News Assault On A Young Man Who Went To Discuss Marriage Ratnagiri Maharashtra

[ad_1]

Ratnagiri News :  लग्नाची बोलणी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला प्राणास मुकावे लागले असते. एका किरकोळ वादातून या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लांजा तालुक्यातील कुरणे पडयेवाडी येथे ही धक्कादायक घटना घडली. सोमवारी, 7 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 
 
लग्नाची बोलणी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर किरकोळ वादातून कोयतीने वार करून त्याला जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी 46 वर्षीय व्यक्तीवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश रामचंद्र पडये (वय 46, राहणार कुर्णे पडयेवाडी) याची घटस्फोटीत मुलगी आहे. या मुली बरोबर लग्न करण्यासाठी तक्रारदार राजेश एकनाथ चव्हाण ( वय 40, राहणार गवाणे तालुका लांजा) इच्छुक होता. यासाठी राजेश चव्हाण आणि सुरेश पडये या दोघांमध्ये बोलणी सुरू होती. तसेच या संदर्भात 4 ऑगस्ट रोजी लग्नाबाबत बोलणीदेखील झाली होती.  

या बोलणीनंतर विवाह करण्याचे निश्चित झाले होते. त्यानंतर सोमवारी 7 ऑगस्ट रोजी राजेश चव्हाण हा सुरेश पडये यांच्या कुर्णे येथे घरी पुन्हा एकदा लग्न संदर्भात बोलणे करण्यासाठी दुपारच्या सुमारास गेला होता. लग्नाबाबतची ही बोलणी सुरू असतानाच दोघांमध्ये किरकोळ स्वरूपात वाद झाला.

या वादातून सुरेश पडये याने आपल्या घरातील कोयती आणून राजेश चव्हाण याच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये राजेश याला पाच टाके पडले आहेत. या घटनेत जखमी झालेल्या राजेश चव्हाण याने 7 ऑगस्ट रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 

राजेश चव्हाण यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सुरेश पडये याच्यावर भारतीय दंड विधान कलम 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे .याबाबत अधिक तपास स्थानिक पोलीस  करत आहेत. 

 

औरंगाबाद हादरलं! प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या, मारहाण करुन विहिरीत फेकून दिलं

आपल्या मुलीसोबत प्रेम प्रकरण आहे, या संशयावरुन तरुणीच्या घरच्या मंडळींनी गावातील एका तरुणाला लाठ्या-काठ्यांनी आधी बेदम मारहाण केली. त्यानंतर जखमी झाल्यावर जिवंत असतानाच विहिरीत फेकून दिल्याची घटना औरंगाबादच्या (Aurangabad) कन्नड तालुक्यातील खातखेडाच्या बामणवाडी येथे घडली आहे. जखमी तरुणाला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नारायण रतन पवार (वय 22 वर्ष, रा. खातखेडा, कन्नड) असे हत्या (Murder) करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पिशोर पोलिसांत 17 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, 8 आरोपींना अटक केली आहे. 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *