ravichandran ashwin come to support hardik pandya mumbai indians he said this not happening first time ipl 2024

[ad_1]

Ravichandran Ashwin Support Hardik Pandya IPL 2024 :  मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक सामन्यावेळी कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ट्रोल होत आहे. रोहित शर्माच्या चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला ट्रोल (Hardik Pandya Troll) करण्यात येत आहे. आयपीएलच्या 17 व्या (IPL 2024) हंगामाला सुरुवात होण्याआधीच चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला (Hardik Pandya)  ट्रोल करण्यात येत होतं. मुंबई इंडियन्सला (mumbai indians) पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे चाहत्यांनी पांड्याला आणखी ट्रोल केले. मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद संभाळल्यानंतर हार्दिक पांड्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. पण आता हार्दिक पांड्याच्या सपोर्टमध्ये भारताचा स्टार अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) उतरला आहे. हे काही पहिल्यांदाच झालेले नाही, अशा शब्दात अश्विनने हार्दिकचा सपोर्ट केला आहे. 

आर. अश्विन काय म्हणाला ? 

हार्दिक पांड्याला स्टेडियममध्ये केले जाणाऱ्या हुटिंगविरोधात आर. अश्विनने नाराजी व्यक्त करत चाहत्यांना स्पष्ट शब्दात सुनावे आहे. अश्विन म्हणाला की, तुम्हाला  जर एखादा खेळाडू आवडत नसेल, त्या खेळाडूचा राग येत असेल अथवा तिरस्कार असेल, तर एखाद्या संघानं त्यावर स्पष्टीकरण का द्यावं? एखादा वरिष्ठ खेळाडू ज्युनियर खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळतोय, ही काही पहिली वेळ नाही. पणआपण असं दाखवत आहेत की असं यापूर्वी कधीही झालं नाही. सचिन तेंडुलकरही सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळला आणि सचिन आणि राहुल हे दोघेही राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळले, तर हे तिघंही अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली खेळले. एकेकाळी हे सर्व एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले. जेव्हा ते धोनीच्या नेतृत्वाखाली खेळते होते, तेव्हा ते सर्व दिग्गज खेळाडू होते.  

हार्दिक पांड्या ट्रोलिंगचा शिकार – 

आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्सने संघबांधणीसाठी मोठा बदल केला. मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माचं कर्णधारपद काढण्यात आले. गुजरातकडून ट्रेंड करण्यात आलेल्या हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने कर्णधार केले. हार्दिक पांड्याला कर्णधार करताच चाहत्यांना राग आला. रोहित शर्मा आणि मुंबईच्या चाहत्यांनी हार्दिक पांड्याला जोरदार ट्रोल केले. गुजरात आणि हैदराबाद यांच्याविरोधातील सामन्यावेळी हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. एक एप्रिल रोजी मुंबईचा सामना वानखेडे मैदानावर होणार आहे. या सामन्यावेळी तर हे प्रमाण जास्त होण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *