Red-ball-in-cricket-know-red-ball-is-made-and-which-material-is-used-for-red-ball-marathi News | Red Ball In Cricket : क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या लाल चेंडूत नेमकं काय भरलेलं असतं? तुम्हाला माहित आहे का? वाचा रंजक माहिती

[ad_1]

Red Ball In Cricket : क्रिकेटच्या (Cricket) खेळात प्रत्येक खेळाडू बॅट (Bat) आणि बॉलने (Ball) एकमेकांना उत्तर देतात. सामन्यात लाल दिसणारा हा चेंडू अनेक विक्रम बदलतो. क्रिकेटच्या मैदानात हा चेंडू जसा महत्त्वाचा असतो. तसाच तो बनवण्याची प्रक्रियाही फार महत्त्वाची असते. जेव्हा तुम्ही हा लेदर बॉल उचलला असेल तेव्हा तो किती जड आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. हा चेंडू सामान्य टेनिस बॉलपेक्षा वेगळा आहे आणि या लाल आवरणाखाली काहीतरी भरलेले आहे. अशा परिस्थितीत आतमध्ये नेमकं काय भरलं असेल ज्यामुळे हा चेंडू हाताला इतका जड लागतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याच चेंडूच्या निर्मितीशी संबंधित काही खास गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.   

बॉलमध्ये काय भरले आहे?

ज्या पद्धतीने पृथ्वीची रचना असते अगदी तशीच रचना क्रिकेटच्या लाल चेंडूची असते. ज्याप्रमाणे, पृथ्वीच्या आत अनेक थर असतात तसेच या लाल चेंडूच्या आतदेखील अनेक प्रकारचे थर असतात. हे थर अर्थात पृथ्वीच्या थरांइतके ऊर्जावान नसतात. खरंतर, या लाल चेंडूचा वरचा भाग चामड्याने झाकलेला असतो. म्हणजेच त्याचे वरचे कव्हर चामड्याचे असते. याचा उल्लेख ग्राऊंडवर असताना कॉमेंटेटर अनेकदा करतात.  

या लाल चेंडूच्या आत दोन प्रकारचे थर असतात. त्याच्या एका भागामध्ये कॉर्कचा तुकडा भरला जातो, ज्यामुळे तो खूप घट्ट राहतो आणि नंतर तो तारेने घट्ट बांधला जातो आणि गोलाकार आकारात बदलतो. चेंडू बनवताना त्याच्या वजनाची विशेष काळजी घेतली जाते. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये या चेंडूचे वजन 155.9-163.0 ग्रॅम असते. हे चार वेगवेगळ्या तुकड्यांमधून बनवले जाते आणि नंतर ते शिवले जातात. यानंतर कव्हर चढवले जाते. त्यानंतर चेंडूला रंग दिला जातो. याच कारणामुळे हा चेंडू हाताला जड लागतो.

बॉलची किंमत किती आहे?

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहसा कुकाबुराचा टर्फ व्हाईट बॉल वापरला जातो. जर या चेंडूच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, साधारण या चेंडूची किंमत 15 हजार रूपये इतकी आहे. मात्र, वेगवेगळ्या कंपनीनुसार, तसेच, चेंडूच्या क्वालिटीनुसार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनीनुसार या चेंडूची किंमत बदलू शकते.

महत्त्वाच्या बातम्या : 

Sushant Singh Rajput : सेम टू सेम… सुशांत सिंह राजपूतचा ‘डुप्लिकेट’! चेहरा आणि लूक्स पाहून चाहतेही हैराण, AI चा वापर?

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *