Retirement नंतर ‘या’ देशात कर्मचाऱ्याची चांदीच चांदी! सर्वाधिक पेन्शन, भारी सुविधा, जाणून घ्या

[ad_1]

Retirement Pension :  सेवानिवृत्ती म्हणजेच Retirement नंतर पेन्शन (Pension) मिळणे हा कर्मचाऱ्याचा हक्क असतो, ज्यामुळे व्यक्तीला वृद्धापकाळात  दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत नाही, तसेच ज्याला जीवन जगण्यात कोणतीही अडचण येणार नाही या उद्देशाने पेन्शनची सुविधा असते. पेन्शनबाबत भारतातील व्यवस्थेबाबत अनेकदा चर्चा होते. पूर्वी जिथे ओपीएस म्हणजेच जुनी पेन्शन योजना लागू होती. म्हणून वर्ष 2004 नंतर NPS राष्ट्रीय पेन्शन प्रणाली लागू करण्यात आली. भारत सरकारने नुकतीच UPS म्हणजेच युनिफाइड पेन्शन योजना जाहीर केली आहे. जी एप्रिल 2025 पासून लागू होईल. आज आम्ही तुम्हाला जगातील अशा देशांबद्दल सांगणार आहोत, जिथे लोकांना उत्कृष्ट पेन्शन मिळते. आणि त्यासोबतच अनेक सुविधा दिल्या जातात.

 

आर्थिक नियोजन आवश्यक

वृद्धापकाळ किंवा निवृत्तीची तयारी करण्यासाठी आर्थिक नियोजन आवश्यक आहे. या नियोजनासाठी आपल्या पेन्शनची व्यवस्था होईल, अशी पगारदार वर्गाची अपेक्षा असते. त्यासाठी गुंतवणुकीची विविध साधनंही शोधली जातात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की, काही निवडक देशात निवृत्तीनंतर म्हणजेच 60 वर्षे आणि वृद्धापकाळानंतर जास्तीत जास्त पेन्शन मिळते. याशिवाय अनेक मूलभूत सुविधाही त्यांना मिळतात. अशा देशांची यादी सीएफए इन्स्टिट्यूट ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये जाहीर केली आहे. जाणून घेऊया

 

या देशांमध्ये सर्वोत्तम पेन्शन 

रिपोर्टनुसार, नेदरलँड, आइसलँड, डेन्मार्क आणि इस्रायलमध्ये निवृत्तीनंतर लोकांना उत्कृष्ट पेन्शन दिली जाते. कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनांबाबत केलेल्या संशोधनात या चार देशांना एक श्रेणी देण्यात आली आहे. या यादीत नेदरलँड पहिल्या स्थानावर आहे. मर्सर सीएफए इन्स्टिट्यूट ग्लोबल पेन्शन इंडेक्सने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये नेदरलँडला 85 इंडेक्स देण्यात आला आहे. तर, या यादीत दुसऱ्या स्थानावर आइसलँड आहे ज्याला 84.8 चा निर्देशांक देण्यात आला आहे. या यादीत डेन्मार्क तिसऱ्या स्थानावर आहे ज्याचा निर्देशांक 81.3 आहे. तर इस्रायल 34 व्या स्थानावर आहे ज्याने 80.8 चा निर्देशांक गाठला आहे. या यादीत अमेरिका 63 इंडेक्ससह 22 व्या स्थानावर आहे. या यादीत भारत 45.9 च्या निर्देशांकासह 42 व्या क्रमांकावर आहे.

 

या सुविधाही उपलब्ध

देशात राहणाऱ्या सेवानिवृत्तांना किती सुविधा दिल्या जातात याबद्दल बोललो तर. म्हणजेच विम्याशिवाय किती आरोग्य सेवा मिळतात. यासोबतच सरकार त्यांना कोणत्या गोष्टींवर सूट देते? तिथली कर व्यवस्था काय आहे, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना किती कर सूट मिळते? यासोबतच उपलब्ध असलेल्या इतर सुविधाही त्यात मोजल्या जातात.

 

सेवानिवृत्त लोकांसाठी टॉप देश

वर्ल्ड स्टॅटिस्टिक्सने शेअर केलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त लोकांच्या राहणीमानाच्या बाबतीत हे जगातील अव्वल देश आहेत. त्यापैकी बहुतेक युरोपमधील आहेत. या यादीत नॉर्वे पहिल्या स्थानावर आहे. यानंतर स्वित्झर्लंड, आइसलँड, आयर्लंड आणि लक्झेंबर्ग. जर आपण यादीत पुढे गेलो तर, जगातील सर्वोत्तम पेन्शन सुविधा असलेला देश नेदरलँड देखील या यादीत सहाव्या स्थानावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया सातव्या, न्यूझीलंड 8व्या, जर्मनी 9व्या आणि डेन्मार्क 10व्या क्रमांकावर आहे.

 

 

हेही वाचा>>>

चिंता वाढली! झपाट्याने पसरतोय Mpox, भारतही सतर्कतेच्या मार्गावर, तुमचं दार ठोठावण्यापूर्वी ‘या’ 6 पद्धतीने स्वत:चं संरक्षण करा

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *