Rocketry The Nambi Effect R Madhavan On Rocketry The Nambi Effect 69 National Film Awards ISRO Scientist Nambi Narayanan Biopic Know Bollywood Movie Details Entertainment

Rocketry The Nambi Effect R Madhavan On Rocketry The Nambi Effect 69 National Film Awards ISRO Scientist Nambi Narayanan Biopic Know Bollywood Movie Details Entertainment

[ad_1]

R. Madhavan On Rocketry : The Nambi Effect National Film Award : मनोरंजनसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (69th National Film Awards 2023) घोषणा झाली आहे. ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ (Rocketry : The Nambi Effect)  हा सिनेमा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कारावर रॉकेट्री लँड झालं आहे. या पुरस्काराबद्दल बोलताना आर. माधवन (R. Madhavan)  म्हणाला,”आमच्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्युरीचे मनापासून आभार”.

‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल एबीपी माझाशी बोलताना आर. माधवन म्हणाले,”आमच्या ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या सिनेमाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्युरीचे मनापासून आभार मानतो. हा पुरस्कार फक्त माझ्यासाठी  महत्त्वाचा नाही तर आम्हा सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. आम्हाला ही गोष्ट सांगायची संधी दिली आमच्यावर विश्वास ठेवला त्या प्रत्येकाचे आभार. नंबी सरांचे जीवन एक प्रेरणा आहे आणि त्यांचा अतुलनीय प्रवास पडद्यावर मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.”

‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ सिनेमाबद्दल जाणून घ्या… (Rocketry : The Nambi Effect Movie Details)

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) माजी वैज्ञानिक नंबी नारायणन (Nambi Narayanan) यांच्या आयुष्यावर आधारित ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ हा सिनेमा आहे. या सिनेमाचे निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक आर. माधवन आहेत. तसेच ते या सिनेमात मुख्य भूमिकेतदेखील आहेत. 1 जुलै 2022 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या सिनेमात आर. माधवन वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या भूमिकेत असून मीरा नारायणनच्या भूमिकेत सीमरन आहे. म्बी नारायणन यांचा ISRO चा प्रवास आणि त्यांचा संघर्ष या सिनेमात दाखवण्यात आला आहे. ध्येयाने झपाटलेल्या माणसाची गोष्ट प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. 

‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ कुठे पाहाल? 

‘रॉकेट्री: नांबी इफेक्ट’ हा सिनेमाअॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे.अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा सिनेमा तामिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. सिनेमागृहात हा सिनेमा हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.

‘रॉकेट्री: नांबी इफेक्ट’ हा सिनेम आर.माधवन यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. 20 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. 

संबंधित बातम्या

Rocketry The Nambi Effect Review : ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’, ध्येयाने झपाटलेल्या माणसाची संघर्षकथा

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *