Rohit Sharma Ipl 2025 50 crore bid for Rohit Sharma in IPL mega auction Lucknow team owner Sanjeev Goenka said all plan

[ad_1]

Rohit Sharma Ipl 2025: आगामी काही दिवसांत आयपीएल 2025 च्या हंगामासाठी मेगा लिलाव होणार आहे. या लिलावाआधी अनेक संघांमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील. अनेक दिग्गज खेळाडू एका संघातून दुसऱ्या संघात जाण्याचा निर्णय घेऊ शकतात, यामध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावाचा देखील समावेश आहे. 

रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या मुंबई इंडियन्स संघाचा (Mumbai Indians) भाग आहे. मात्र हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सला कर्णधार बनवल्यानंतर रोहित शर्मा नाराज असल्याचं बोललं गेलं. त्यामुळे आयपीएल 2025 च्या हंगामात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला सोडून लखनौचा ताफ्यात दाखल होऊ शकतो, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. तसेच मेगा लिलावात रोहित शर्माने ना दिल्यास लखनौ सुपर जायंट्सकडून 50 कोटी रुपयांची बोली लावणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. याचदरम्यान लखनौ संघाचे मालक संजीव गोयंका यांनी मोठं विधान केलं आहे. 

संजीव गोयंका काय म्हणाले?

रोहित शर्मासारख्या खेळाडूमुळे कोणत्याही संघाला फायदा होईल, पण त्याच्यावर एवढी मोठी रक्कम खर्च करणे योग्य होणार नाही, असे मत संजीव गोयंका यांनी व्यक्त केले. एका मुलाखतीदरम्यान संजीव गोएंका म्हणाले, कोणालाही माहिती नाही की रोहित शर्मा लिलावात भाग घेत आहे की नाही? मुंबई इंडियन्स रोहितला सोडणार का यावर अवलंबून आहे. तरीही, जर रोहित लिलावात सहभागी झाला आणि जर तुम्ही त्याच्यावर पर्समधील 50 टक्के खर्च केला तर तुम्ही इतर खेळाडूंना कसे खरेदी करू शकाल. प्रत्येकाला चांगला खेळाडू आणि कर्णधार हवा असतो. तुमच्याकडे काय आहे आणि तुम्ही त्यासोबत काय करू शकता यावर ते अवलंबून आहे, असं संजीव गोयंका म्हणाले. 

झहीर खान लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात-

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 पूर्वी लखनौ सुपर जायंट्सने मोठा बदल केला आहे. लखनौने टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडू झहीर खानला संघाचा मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून नियुक्त केले आहे. झहीर खानने भारतासाठी 17 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. झहीर खानने 200 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये 282 विकेट्स घेतल्या आहेत. तर झहीर खानने टीम इंडियासाठी एकूण 311 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.

रोहितसह 4 प्रमुख खेळाडूंना डच्चू?

आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केले होते. रोहित शर्माला (Rohit Sharma) हटवून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार करण्यात आले. मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माच्या हातून सोडून हार्दिकच्या हाती गेले. गेल्या हंगामातही रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापन यांच्यातील संबंध फारसे चांगले नसल्याचा अंदाज लावला जात होता. आता केवळ रोहितच नाही तर हार्दिक पांड्यालाही संघातून वगळले जाऊ शकते अशी बातमी आहे. त्यांच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज टीम डेव्हिड यांनाही संघातून रिलीज केले जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातमी:

PAK vs BAN: लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघात बदल; बांगलादेशविरुद्ध दोन घातक खेळाडूंची संघात एन्ट्री!

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *