Sahkutumb Sahparivar Marathi Serial Actress Sakshee Gandhi Share Post On Social Media

[ad_1]

Sahkutumb Sahparivar : छोट्या पडद्यावरील सहकुटुंब सहपरिवार (Sahkutumb Sahparivar) या मालिकेनं 1000 भागांचा टप्पा गाठला आहे. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. नुकतीच या मालिकेतील अभिनेत्री साक्षी गांधीनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

साक्षी गांधीनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, ’24 फेब्रुवारी  2020 या दिवशी चालू झालेला हा प्रवास आता तुम्हा सगळ्यांच्या आशिर्वादाने , प्रेमामुळे 1000 भागांचा टप्पा गाठत आहे .अवनी. अवनी सर्जेराव घोरपडे आणि लग्नानंतरची सहकुटुंब सहपरिवारमध्ये आलेली , सौ. अवनी वैभव मोरे .जर कुणी मला साक्षी म्हणून मला हाक मारली तर कदाचित पटकन कळणार नाही ,पण अवनी म्हटल्यावर आपसूक ओ.मी नेहमी म्हणते की तुमच्या करिअर च्या सुरुवातीला तुम्हाला इतकं चांगल प्रोजेक्ट मिळणं आणि त्या मालिकेचे 1000 भाग होणं ही खरच खूप भाग्याची गोष्ट असते. आणि त्यातली एक भाग्यवान मी .अवनी हे पात्र करत असताना मला सुरुवातीला अंदाजच यायचा नाही . मी हे जे करतेय ते प्रेक्षकांना आवडत असेल का ? आपण बरोबर करतोय का ? काही चुकतंय का ? आपल्यावरकुणी हसणार नाही ना ?? असे एक ना अनेक प्रश्न पडायचे.’

पुढे तिनं पोस्टमध्ये लिहिलं, ‘पण डोक्यात एक गोष्ट फिक्स होती की चिपळूण ते मुंबईपर्यंतचा पल्ला या negativity साठी नाही गाठलेला. त्यामुळे साक्षी तू कामाप्रती निष्ठा , प्रामाणिकपणा, मिळालेल्या कामाचा आदर ठेव ..या गोष्टी मी स्वतःला सतत सांगायचे . अवनी या पात्राच्या खूप shades . अवनी अल्लड , हसरी , पटकन रागावणारी , रडणारी , स्पष्टवक्ती , स्वतंत्र , हळवी अशी होती . त्यामुळे खूप सांभाळून हे पात्र वठवाव लागायचं . आणि यासाठी मला भक्कम पाठिंबा , मदत केली , ते म्हणजे आमचे भरत सर. सर आज तुमच्यामुळे अवनी सगळयांना परिचयाची आहे.पहिल्या दिवशी जितकी भीती होती मनात , तितकंच शेवटच्या दिवशी डोळ्यात पाणी होतं . अवनी या पात्रासाठी शेवटचं तयार होत असताना . ती साडी , ती jewellery , ती टिकली .. अवनी हे पात्र अक्षरशः अंगात भिनलेलं. 2 दिवसांच्या वर सुट्टी असेल तर बेचैन व्हायला व्हायचं . आणि याच कारण म्हणजे उत्तम co artist.खूप भिती असायची मनात , या मोठ्या आर्टिस्ट समोर काही चुकायला नको . fumbles व्हायला नकोत , retakes नकोत .’

इतर महत्वाच्या बातम्या:

Sahkutumb Sahparivar : ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; सेटवर कलाकारांनी केलं दणक्यात सेलिब्रेशन



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *