Sangli Crime Assault On Minor Girl By Going Home For Carpentry 20 Years Imprisonment For Accused

[ad_1]

Sangli Crime : सुतारकामासाठी घरी जाऊन अतिप्रसंग करणार्‍या अल्पवयीन मुलीवर आरोपीला सांगली (Sangli News) जिल्हा सत्र न्यायालयाने 20 वर्षे कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी ठोठावली. दंडातील सर्व रक्कम पीडिताला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

पीडिताचे घरी आरोपी राजेबाकसर राजेसाब पिरजादे (वय 59 रा.वाल्मिकी आवास योजना, सांगली) हा सुतारकामासाठी आला होता. पीडिता शाळेहून आल्यानंतर चेंडूने खेळत होती. खेळत असताना चेंडू सुतार काम करत असलेल्या आरोपीकडे गेला. यावेळी चेंडू आणण्यासाठी पीडिता गेली असता तिच्याशी गैरवर्तन केले. हा प्रकार तिने आईला सांगितला. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात पीडिताच्या आईने तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणात तपास करुन आरोपीविरुद्ध आरोपपत्र जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाखल केले होते. न्या. डी.एस. हातरोटे यांनी आरोपीला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषी ठरवून 20 वर्षे सश्रम कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारपक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले.

2019 मधील प्रकरण 

मुलीशी अतिप्रसंग झाल्यानंतर पीडिताच्या आईने फिर्याद दिली होती. आरोपी राजेबाकसरच्या फिर्यादीच्या घरी येणे जाणे असल्याने ओळख होती. 16 ऑक्टोबर 2019 रोजी फिर्यादीच्या पतीने राजेबाकसरला किरकोळ सुतारकामासाठी घरी बोलावले होते. यानंतर किरकोळ दुरुस्तीची काम सांगितल्यानंतर पती कामावर निघून गेले. यावेळी पीडिताची आई किचनमध्ये काम करत होती. यावेळी हाॅलमध्ये खेळत असलेल्या मुलीच्या हातातील चेंडू आरोपीकडे त्याने गैरकृत्य केले होते. पीडिता रडू लागल्यानंतर आई बाहेर आली आणि झालेला प्रकार लक्षात आला. यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. 

विनयभंगप्रकरणी दोन वर्षाची सक्तमजुरी

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने हिटणी (ता. गडहिंग्लज) येथील इराप्पा मलाप्पा कंकणवाडी (वय 36) याला दोन वर्षे सक्तमजुरी, दोन हजार दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली. दहा दिवसांपूर्वी त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्या. एस. ए. राठोड यांनी हा निकाल दिला. गावातील शेतात 10 ऑक्टोबर 2013 रोजी विनयभंग केल्याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिली होती. तत्कालीन हवालदारांनी घटनेचा तपास करुन कंकणवाडीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी न्या. राठोड यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाकडून अ‍ॅड. नीता चव्हाण यांनी पाच साक्षीदार तपासले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *