Sara Kahi Tichyasathi Upcoming Marathi Serial Television Promo Viral On Social Media

[ad_1]

Sara Kahi Tichyasathi : छोट्या पडद्यावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतात. या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. आता ‘सारं काही तिच्यासाठी’ (Sara Kahi Tichyasathi) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचे दोन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 

‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका 21 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचे दोन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या प्रोमोला नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ‘ही मालिका सपने सुहाने लडकपन के या हिंदी मालिकेचा रिमेक आहे का?’ असा प्रश्न विचारला आहे.  

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेमध्ये  दोन बहिणींची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, या बहिणी एकमेकींसोबत बोलत नसतात. त्यावर एका नेटकऱ्यानं कमेंट केली,  ‘व्हॉट्स अॅप नाही का? फोन नाही का? तुम्ही एकमेकांना मिस करत असाल तर फोन करा एकमेकींना’ तर दुसऱ्या युझरनं या मालिकेच्या प्रोमोवर कमेंट केली,’सपने सुहाने लडकपन के मालिकेचा मराठी रिमेक वाटत आहे.’ तर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘पदमती संध्यारागम या तेलुगू मालिकेचा रिमेक वाटत आहे.’
‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


‘सारं काही तिच्यासाठी’ ची स्टार कास्ट

खुशबू तावडे, शर्मिष्ठा राऊत, अशोक शिंदे हे कलाकार ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. उमा ही भूमिका खुशबू तावडे ही या मालिकेत साकारणार आहे तर शर्मिष्ठा राऊत ही संध्या ही भूमिका साकारणार आहे. प्रेक्षक या मालिकेची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


संबंधित बातम्या

Sara Kahi Tichyasathi : ‘सारं काही तिच्यासाठी’ नवी मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; खुशबू तावडे आणि शर्मिष्ठा राऊत मुख्य भूमिकेत



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *