Saregamapa Little Champs Fame Singer Rohit Raut In Marathi Serial 36 Guni Jodi Television Entertainment Latest Update

[ad_1]

Rohit Raut : ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला रोहित राऊत (Rohit Raut) आता अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. झी मराठीवरील ’36 गुणी जोडी’ (36 Guni Jodi) या मालिकेत त्याची एन्ट्री झाली आहे. या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

‘प्रत्येक जोडी जुळत नसते’ असं म्हणत सुरु झालेली ’36 गुणी जोडी’ ही मालिका प्रेक्षकांचे विशेषतः तरुणाईचं लक्ष वेधून घेणारी ठरत असून मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. वेदांत ऑफिस पिकनिक साठी नकार देत असतानाच आता या मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. कारण ‘३६ गुणी जोडी’ मध्ये एका नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे, त्यांच नाव आहे ‘अमर्त्य’.

‘अमर्त्य’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ फेम गायक रोहित राऊत. आता वेदांताचा बेस्ट फ्रेंड म्हणवणारा हा अमर्त्य नेमका कोण, तो वेदांत आणि अमूल्यच्या नात्यात अंतर निर्माण करेल ? अमर्त्य ला अमुल्याच्या जवळ येताना पाहून वेदांत जेलस होईल? हे आपल्याला येणाऱ्या भागात कळणार आहे. कारणआता दोघात तिसरा येणार असल्याने प्रेमाची आग भडकणार आहे.

रोहित राऊत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी तो चाहत्यांशी शेअर करत असतो. आता त्याचा अभिनय पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. रोहितने  सा रे ग म प लिटिल चॅम्प्सच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यानंतर तो इंडियन आयडलमध्ये देखील दिसला होता. त्याने अनेक मराठी रिअॅलिटी शो केले आहेत. आता त्याला एका मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 आपल्या दमदार आवाजामुळे रोहितने फार कमी दिवसातच लोकप्रियता मिळवली होती. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या वर्षीच रोहितने गायिका जुईली जोगळेकर सोबत लग्नगाठ बांधली होती.  जुईली देखील उत्तम गायिका आहे. दोघेही रिअलिटी शोमध्ये गाताना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून रोहित आणि जुईली एकमेकांना डेट करत होते. अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोतचे फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती.

संबंधित बातम्या

ROHILEE : रोहित आणि जुईली अखेर लग्नबंधांत अडकले; पहा लग्नसोहळ्याचे खास फोटो!

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *