[ad_1]
Seema Deo: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचे आज निधन झाले आहे. सीमा देव गेल्या तीन वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. सीमा देव यांनी वांद्रे येथील राहत्या घरी आज सकाळी 7 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सीमा देव यांनी वयाच्या 81 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये सीमा यांनी काम केले. 1956 मध्ये प्रदर्शित झालेल्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. आनंद, जगाच्या पाठीवर,यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, हा माझा मार्ग एकला चित्रपटांमध्ये सीमा यांनी काम केलं.
.
[ad_2]
Source link