Shah Rukh Khan Jawan Shah Rukh Khan Jawan Movie Trailer To Release At Burj Khalifa Dubai On 31 August 9pm Know Jawan Trailer Movie Details Entertainment

Shah Rukh Khan Jawan Shah Rukh Khan Jawan Movie Trailer To Release At Burj Khalifa Dubai On 31 August 9pm Know Jawan Trailer Movie Details Entertainment

[ad_1]

Jawan Trailer Release Date : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) आगामी ‘जवान’ (Jawan) या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांना या सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता लागली आहे. ‘जवान’या सिनेमाच्या ट्रेलरचं दुबईतील (Dubai) बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) स्क्रीनिंग होणार आहे.  

शाहरुख खानचा ‘जवान’ हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किंग खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ‘जवान’च्या ट्रेलरची महत्त्वाची अपडेट दिली आहे. ‘जवान’ या सिनेमाचा ट्रेलर (Jawan Trailer Release Date) 31 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जवान’चा ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

शाहरुखने ट्वीट काय केलं आहे? (Shah Rukh Khan Tweet)

शाहरुखने ट्वीट करत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बुर्ज खलिफावर ‘जवान’चं पोस्टर झळकलेलं दिसत आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिलं आहे,”जवान’चा आनंद मी तुमच्यासोबत साजरा करू शकत नाही, असं होऊ शकत नाही. बुर्ज खलिफावरुन मी 31 ऑगस्टला रात्री 9 वाजता तुमच्या भेटीला येच आहे. माझ्यासोबत ‘जवान’चा ट्रेलर तुम्हीही पाहा. जगातील सर्वात सुंदर गोष्ट प्रेम आहे. प्रेमाच्या रंगात न्हाऊन जायला तुम्ही तयार आहात का?”. 

‘जवान’ कधी होणार रिलीज? (Jawan Release Date)

शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक एटली कुमार यांनी केलं आहे. ‘जवान’ या सिनेमात शाहरुख खानसह नयनतारा, योगी बाबू, रिद्धी डोगरा आणि सुनील ग्रोवर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची (Deepika Padukone) झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 

शाहरुखचा ‘जवान’ हा सिनेमा पॅन इंडिया सिनेमा आहे. या सिनेमात शाहरुखचे सहा वेगवेगळे लूक पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करणार आहे. ‘पठाण’चा रेकॉर्ड हा सिनेमा ब्रेक करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. परदेशानंतर आता भारतातही या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan : बॉक्स ऑफिसवरचा बादशाह शाहरुख खान! मुंबईत ‘जवान’चे एक मिनिटात विकले गेले 1100 तिकीट

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *