[ad_1]
Shah Rukh Khan Jawan Vs Prabhas Salaar : ‘गदर 2’ने (Gadar 2) भारतीय सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत. शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘जवान’ (Jawan) हा सिनेमा आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) ‘सालार’ (Salaar) हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. आता दोन्ही सिनेमांच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. पण अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ‘सालार’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यश आलं आहे.
‘जवान’ या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला परदेशात काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमामुळे ‘जवान’ चांगली कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ‘जवान’ हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकंदरीत हा सिनेमा प्रदर्शित व्हायला अजून दहा दिवस बाकी आहेत.
‘जवान’ आणि ‘सालार’च्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल जाणून घ्या… (Jawan Salaar Advance Booking)
‘जवान’ या सिनेमाने आतापर्यंत 1.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. टेक्सास आणि कॅलिफोर्नियामध्ये ‘जवान’ सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे दाक्षिणात्य सुपरस्टार ‘जवान’च्या ‘सालार’ या सिनेमाने 3.19 कोटींची कमाई केली आहे. 321 ठिकाणातील 952 शोमधील 13,540 तिकीट आतापर्यंत विकले गेले आहेत. हा सिनेमा प्रदर्शित व्हायला अजून 32 दिवस बाकी आहे. रिलीजआधीच या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक एटली कुमार ‘जवान’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. ‘जवान’ हा शाहरुखचा बिग बजेट सिनेमा आहे. 300 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. शाहरुखच्या रेड चिलीज या निर्मिती संस्थेच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमातील चलेया आणि जिंदा बंदा ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रवितंदर यांनी ही गाणी गायली आहेत.
‘सालार’ कधी होणार रिलीज? (Salaar Release Date)
प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार’ या सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली आहे. हा सिनेमा 28 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा तेलुगू, कन्नड, मल्याळम, तामिळ आणि हिंदी या पाच भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली पण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात हा सिनेमा कमी पडला. त्यामुळे आता ‘सालार’ नक्की किती कमाई करतो याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या
Shah Rukh Khan : बॉक्स ऑफिसवरचा बादशाह शाहरुख खान! मुंबईत ‘जवान’चे एक मिनिटात विकले गेले 1100 तिकीट
.
[ad_2]
Source link