Shahrukh Khan Daughter Suhana Khan Gave Money To Woman Asking For Money Video Viral On Social Media

[ad_1]

Suhana Khan:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) ही तिच्या स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. सुहाना (Suhana Khan) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचा आर्चिस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या सुहाना  ही तिच्या चित्रपटामुळे नाही तर एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे.  सुहानाच्या एका व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकरी तिचे कौतुक करत आहेत. 

सुहाना खानच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुंबईमधील एका रेस्टॉरंटमधील इव्हेंट अटेंड केल्यानंतर सुहाना ही तिच्या गाडीजवळ जाते. त्यानंतर  एक महिला तिच्याकडे पैसे मागते आणि सुहाना पटकन तिची हँडबॅग उघडते आणि तिला 500 रुपयांची नोट देते. सुहानाने पैसे देताच ती महिलेला आनंद होतो.

नेटकऱ्यांनी सुहानाचं केलं कौतुक

सुहाना खानच्या व्हायरल व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. सुहानाच्या या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, “ती खूप चांगली आहे, तिच्यावर वडिलांचे संस्कार आहेत.” तर दुसऱ्या युझरनं सुहानाच्या व्हायरल व्हिडीओला कमेंट केली, “ती खूप सुंदर दिसत आहे. तसेच ती Down To Earth आहे.”

पाहा व्हिडीओ:


सुहानाचा द आर्चीज चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस

चित्रपट निर्माती झोया अख्तरचा आगामी चित्रपट द आर्चीजमध्ये सुहाना काम करणार आहे. ज्यामध्ये ती वेरोनिका लॉज या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अगस्त्य नंदा (आर्ची अँड्र्यूज) आणि खुशी कपूर (बेटी कूपर)  हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. त्यांच्याशिवाय या चित्रपटात वेदांग रैना, युवराज मेंडा, मिहिर आहुजा आणि आदिती डॉट यांच्याही भूमिका आहेत. सुहानाच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

सुहाना ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिला इन्स्टाग्रामवर चार मिलियन फॉलोवर्स आहेत. सुहाना तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. सुहानाच्या फोटोवर नेटकरी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Suhana Khan : शाहरुखची लेक सुहाना खान शेती करणार? आलिबागमध्ये खरेदी केली कोट्यवधी किंमतीची जमीन

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *