Siddarth Jadhav Share Post About Mother And Father

[ad_1]

Siddarth Jadhav: अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddarth Jadhav) हा सोशल मीडियावर त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देतो. सिद्धार्थ त्याच्या अभिनयानं आणि विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतो. सिद्धार्थनं नुकतीच त्याच्या आई वडिलांसाठी फॉरेन टूर प्लॅन केली आहे. याबाबत सिद्धार्थनं एक खास पोस्ट शेअर करुन माहिती दिली.

सिद्धार्थची पोस्ट

सिद्धार्थनं सोशल मीडियावर त्याच्या आई-बाबांचे फोटो शेअर केले. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, “This is the moment, आई बाबांचा पहिला परदेश दौरा, माझ्यासाठी हा क्षण किती महत्त्वाचा आहे .हे मी शब्दात नाही सांगू शकत.त्यांच्या आशीर्वादाने “मी जग बघायला फिरलो आणि आज त्यांच्याच आशीर्वादाने मी त्यांना जग बघायला पाठवतोय. त्यातला आज त्यांचा हा “पहिला प्रवास.”माझ्या शाळेतल्या पहिल्या सहली पासून ते आतापर्यंत लंडनला शूटला जाईपर्यंत जी excitment , जो आनंद, त्यांना असायचा तशीच किंवा त्यापेक्षा जास्त excitment,तसाच आनंद आज मला वाटतोय.ते मला जे नेहमी सांगायचे तेच आज मी त्यांना सांगतोय. तुम्ही मज्जा करा..माझी काळजी नको. मी आहे तुमच्यासोबत. कायम. सिध्दू”


सिद्धार्थनं शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी सिद्धार्थच्या पोस्टला कमेंट करुन त्याचं कौतुक केलं आहे.

सिद्धार्थचे चित्रपट

सिद्धार्थच्या  दे धक्का, जत्रा,  दे धक्का-2, टाइम प्लिज, लोच्या झाला रे या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. सिद्धार्थचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची वाट बघत आहेत. सिद्धार्थनं अनेक मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.

 सिद्धार्थन सिम्बा या चित्रपटामध्ये काम केलं. तसेच त्यानं रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटामध्ये देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. सिद्धार्थनं बॉलिवूडमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली आहे. सिद्धार्थचा काही दिवसांपूर्वी ‘अफलातून’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. 

सिद्धार्थ हा सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो शेअर करतो. त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. त्याला इन्स्टाग्रामवर 768K फॉलोवर्स आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Siddharth Jadhav: नेटकऱ्यानं सोशल मीडियावर कमेंट करुन दिली शिवी; सिद्धार्थ जाधव म्हणाला, ‘ट्रोलिंग मान्य आहे पण…’

 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *