Subhedar Trailer Chinmay Mandlekar Share Post On Social Media

[ad_1]

Subhedar Trailer:  दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar)  यांचा  ‘सुभेदार’ (Subhedar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुभेदार या चित्रपटाची टीम सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. दोन दिवसांपूर्वी सुभेदार या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. दोन दिवसात या ट्रेलरला दोन मिलियपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. याबाबत नुकतीच अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यानं एक खास पोस्ट शेअर केली आहे.

चिन्मय मांडलेकरनं सुभेदार या चित्रपटाचं पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘आपल्या ‘सुभेदार’ ट्रेलरला अवघ्या 2 दिवसांत 2 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूजचा विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार..! आता भेट 18 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात.’

चिन्मयनं शेअर केलेल्या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘अजून खूप सारे रेकॉर्ड तुटणार आहे..जय शिवराय!’ 

अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) हे सुभेदार या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. तर चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. ‘सुभेदार’ हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

‘सुभेदार’ या आगामी चित्रपटात मृणाल कुलकर्णी जिजाऊ आईसाहेबांच्या, विराजस जीवाच्या भूमिकेत पहायला मिळणार असून यशोदाबाई मालुसरेच्या भूमिकेत शिवानी रांगोळे दिसणार आहे. 

‘सुभेदार’  या चित्रपटामधील ‘आले मराठे आले मराठे’ आणि   ‘मावळं जागं झालं रं…’ ही दोन गाणी काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या गाण्यांना नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळाली आहे.

संबंधित बातम्या

Subhedar Trailer: “आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं…”; ‘सुभेदार’ चित्रपटाचा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीस

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *