Thane Joshi Bandodkar College Ncc Cadets Assault Case Victim Students Say They Dont Have Any Objection

[ad_1]

Thane NCC Cadets :  ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या सगळ्या घटनेनंतर आता मारहाण झालेल्या एनसीसी विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. झालेल्या त्या घटनेबद्दल कोणताही आक्षेप नसल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले. 

ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयातील एनसीसी युनिटच्या विद्यार्थ्यांचा मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वच पक्षांनी आंदोलन करत विरोध दर्शवला. परंतु नक्की या व्हिडिओमध्ये काय सत्य आहे हे आम्ही जाण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.  झालेला प्रकार हा सर्व चुकीच्या पद्धतीने दाखवला जात असून व्हिडिओ व्हायरल केला जात असून व्हिडिओ मागील तथ्य वेगळेच असल्याचा दावा विद्यार्थ्यांच्यावतीने करण्यात आला.

मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांनी काय म्हटले?

विद्यार्थ्यांनी म्हटले की, आम्हाला दिले जाणारे शिक्षण हे अतिशय उत्तम प्रकारचे असून आम्हाला याबद्दल काहीही आक्षेप नाही.  त्याचबरोबर आमच्या पालकांना देखील याबद्दल काही आक्षेप नाही.  या उलट आम्हाला भारतीय सैन्यात भरती व्हायचं असेल तर आणखीन कठीण शिक्षण आणि सराव करावा लागणार आहे. आमचे सीनियरशी अतिशय चांगले संबंध असून या व्हिडिओ बाबत केली जाणारी बदनामी ही थांबवावी, असे आवाहन यावेळी त्या व्हिडिओतील विद्यार्थ्यांनीच केले. 

एनसीसीच्या सीनियर कॅडेट्सने काय म्हटले?

तर,  सीनियर या नात्याने आम्ही त्यांना शिक्षण देतो परंतु त्यांना दुःख पोहोचवण्याचा आमचा कोणताही हेतू नसून आम्ही त्यांना सक्षम करत असतो, असा दावा एनसीसीमधील सीनियर विद्यार्थ्यांनी केला.  महाविद्यालयातील याच एनसीसी युनिट मधून चार ते पाच विद्यार्थ्यांची अग्निवीर जवानांमध्ये निवड झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे व्हिडीओ चुकीच्या प्रकारे दाखवणे योग्य नसून इतर नागरिकांनी हे प्रकार थांबवावे अशी मागणी यावेळी केली.

नेमकी घटना काय?

शिक्षक नसताना या विद्यार्थ्यांना सीनिअर्सकडून होत असलेल्या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. पावसामध्ये, चिखलात या विद्यार्थ्यांना उलटं झोपायला लावून ही मारहाण केलेली आहे. मारहाण करणारा विद्यार्थी हा सीनिअर एनसीसी कॅडेट आहे. 

जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे NCC चे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणदरम्यान विद्यार्थ्याना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येतात. याच दरम्यान विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येते. मात्र ही शिक्षा अशा अमानवी प्रकारची असल्याचं समोर आल्याने खळबळ माजली.

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *