The Archies Gets Its Release Date Suhana Khan Agastya Nanda Khushi Kapoor Starrer Premiere December 7

The Archies Gets Its Release Date Suhana Khan Agastya Nanda Khushi Kapoor Starrer Premiere December 7

[ad_1]

The Archies: द आर्चीज (The Archies) या लोकप्रिय अमेरिकन कॉमिक्सवर आधारित द आर्चीज हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या रिलीज डेटची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.  द आर्चीज  या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खानची (Shah Rukh Khan) लेक सुहाना खान (Suhana Khan) ही अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

द आर्चीज कधी होणार रिलीज?

दिग्दर्शिका झोया अख्तरचा  द आर्चीज या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.7  डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे.

नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर करुन द आर्चीज या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं, ‘आमच्या कथेचा काउंटडाउन सुरु झाला आहे.  द आर्चीज 7 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.’

‘द आर्चीज’ ची स्टार कास्ट

सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खान हिच्यासोबत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे देखील ‘द आर्चीज’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ‘द आर्चीज’  या चित्रपटामध्ये 1964 मधील कधा दाखवण्यात येणार आहे.

मैत्री,फ्रिडम, प्रेम आणि हार्ट ब्रेक हे सर्व ‘द आर्चीज’ या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटात आर्ची, बेट्टी, वेरोनिका, जुगहेड, रेगी, एथेल आणि डिल्टन या भूमिकांची कथा दाखवण्यात येणार आहे.  काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. आता या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

पाहा टीझर

इतर महत्वाच्या बातम्या:

The Archies : प्रेम, मैत्री अन् ब्रेकअप; ‘द आर्चीज’चा टीझर रिलीज! सुहाना खानच्या अभिनयाने जिंकले चाहत्यांचे मन

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *