Traffic Challan For Video Shoot Over The Car Bonet Viral Video

[ad_1]

Photo/Video Shoot with Car: आजकाल लोकांना सोशल मीडियावर (Social Media) फेमस होण्याचं इतकं वेड लागलं आहे की त्यासाठी ते कोणत्याही पातळीवर जाण्यास तयार असतात. सोशल मीडियावर लोक चित्र-विचित्र प्रकार करुन व्हिडीओ पोस्ट करत असतात. लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या चक्करमध्ये ते स्वत:च्या सुरक्षिततेचा विचार देखील करत नाहीत आणि भयंकर प्रकार करतात. काहीजण गाडीच्या दारावर उभं राहून किंवा गाडीवर बसून व्हिडीओ बनवतात आणि नंतर त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागते. फोटो, व्हिडीओ काढण्यासाठी वाहतूक नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जातं. वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास अशा गोष्टी आल्यास वाहनचालकांना त्याची मोठी झळ बसते. आज अशाच एका कारणाविषयी जाणून घेऊया, ज्यामुळे तुमचं चलान कापलं जाऊ शकतं. ते टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, हे देखील पाहूया.

गाडीच्या बोनेटवर बसून बनवला व्हिडीओ, बसला दंड

सोशल मीडियावर असे व्हिडीओ अनेकदा पाहायला मिळतात, ज्यामध्ये अनेक लोक चालत्या गाडीच्या बोनेटवर बसून व्हिडिओ बनवत असतात. असे कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांची नजर पडली तर त्यांना मोठा दंड भरावा लागतो.

वाहतूक पोलिसांनी अलीकडेच असा व्हिडीओ बनवणाऱ्यांच्या गाडीवर मजबूत दंड लगावला आहे. सोशल मीडियावर हल्लीच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, प्रयागराजचा हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडीओमध्ये नवरी तयार होऊन गाडीच्या बोनेटवर बसली होती आणि तिचा व्हिडिओ शूट केला जात होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तो पोलिसांच्याही निदर्शनास आला आणि पोलिसांनी लगेच कारवाई केली. या प्रकारासाठी गाडी मालकाला 15 हजार 500 रुपयांचा दंड भरावा लागला. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही नवरी सोशल मीडियावर अधिक लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शूट करत होती. याआधीही या महिलेने हेल्मेटशिवाय बाईक चालवण्याचा प्रकार केला आहे, त्यावेळीही पोलिसांनी तिच्याकडून दंड आकारला होता.

स्वतःसोबत दुसऱ्यांसाठीही आहे धोकादायक

सार्वजनिक ठिकाणी असे फोटो/व्हिडिओ शूट करणं केवळ स्वतःसाठीच नाही, तर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर लोकांसाठीही हे असुरक्षित आहे. म्हणूनच गाडीवर बसून किंवा उभं राहून असे फोटो आणि व्हिडीओ करणं टाळावं. यामुळे तुमच्या खिशावर ताण पडण्यापासून वाचेल आणि जीवितहानीसारखे गैरप्रकार देखील टाळता येतील.

हेही वाचा:

Car loan Information:
Calculate Car Loan EMI



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *