Tuja Maja Sapan Marathi Serial Wedding Special Episode Know Television Latest Update

[ad_1]

Tuja Maja Sapan : ‘तुजं माजं सपान’ (Tuja Maja Sapan) ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. वीरेंद्र आणि प्राजक्ता या दोन पैलवानांच्या आयुष्यावर आधारित असलेली ही मालिका लोकांच्या मनात घर करते आहे. प्राजक्ता ही खऱ्या आयुष्यातली पैलवान असून मालिकेतही ती पैलवानाच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळते आहे.  

‘तुजं माजं सपान’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. या मालिकेच्या माध्यमातून प्राजक्ता आणि वीरू यांच्या प्रेमाची निराळी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेत प्राजक्ताचा कुस्ती खेळण्याचा प्रवास दाखवला जातो आहे. पण आता मालिका वेगळे वळण घेणार आहे. मालिकेत आता वीरू आणि प्राजक्ता यांचं लग्न होणार आहे. 

वीरूची आई त्याचं लग्न व्हावं यासाठी  प्रयत्न करत होती. बरेच प्रयत्न करूनही तो काही लग्नाला तयार होत नव्हता. पण आईनी त्याला समजावून लग्नासाठी तयार केलं आहे. आता मालिकेत लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. प्राजक्ता आणि वीरू यांच्या लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात काय फेरबदल होतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

तांबड्या मातीत हळदीचा पिवळा रंग उधळणार

प्राजक्ता आणि वीरूच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आता या दोन पैलवानांचं लग्न कसं होणार याची प्रेक्षकांना  उत्सुकता आहे. कुस्तीच्या या तांबड्या मातीत हळदीचा पिवळा रंग उधळणार आहे. याच तांबड्या मातीतून आता प्रेमाचं तुफान येणार का, हे आता मालिकेत पाहायला मिळेल.  एखाद्या मालिकेत  कुस्तीपटूंचं लग्न पहिल्यांदाच दाखवलं जाणार आहे. या लग्नामुळे वीरूच्या आयुष्यात काय फेरबदल होतील? तो कुस्तीच्या आणि लग्नाच्या विरोधात आहे आणि प्राजक्ताच्या येण्यानं कुस्ती त्याच्या आयुष्यात पुन्हा येणार आहे. त्यामुळे तो या परिस्थितीवर कशी प्रतिक्रिया देतो, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

प्राजक्ताच्या आयुष्यात फार मोठे फेरबदल होणार आहेत. लग्नानंतर कुस्ती खेळता येईल का? तांबड्या मातीत कुस्ती खेळून पुढे प्रगती करायचं तिचं स्वप्न अपुरं राहील का? प्राजक्ता आणि वीरू यांच्या लग्नानंतर वीरेंद्रच्या घरातलं  वातावरणही बदलेल. वीरूच्या आईला नक्कीच याचा आनंद आहे. वीरेंद्रने मार्गी लागून संसार करावा, अशी त्यांची इच्छा आहे. वीरूच्या डोळ्यांतलं त्याचं स्वप्न प्राजक्ता पूर्ण करेल का आणि त्यांचा हा प्रवास कसा असेल, हे आपल्याला मालिकेत दिसणार आहे.

‘तुजं माजं सपान’चा रंगणार विवाह विशेष भाग

मालिकेची मूळ गोष्ट ही कोल्हापूरची आहे. प्राजक्ताची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ही मुळातच कुस्तीपटू आहे. साताऱ्याला राहणारी ही अभिनेत्री गेली अनेक वर्षे कुस्तीचा सराव करते आहे. सोनी मराठी वाहिनी नेहमी आशयघन विषय घेऊन येते ‘तुजं माजं सपान’ या मालिकेतून एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर मांडला आहे. या नव्या जोडीचे सामायिक ध्येय आणि स्वप्न काय असेल आणि त्यांची स्वप्नपूर्ती कशा प्रकारे होईल, हे या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळतं आहे. ‘तुजं माजं सपान’ मालिकेचा विवाह विशेष भाग येत्या 29 जुलैला संध्याकाळी सात वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Tuja Maja Sapan : नवऱ्याच्या हरवलेल्या मानासाठी ती लढणार दोघांच्या स्वप्नासाठी…; ‘तुजं माजं सपान’ नवी मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *