[ad_1]
TV Actor Pawan Singh Death : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता पवन सिंहचे (Pawan Singh) निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचे निधन झाले आहे. वयाच्या 25 व्या वर्षी त्याने मुंबईत राहत्या घरी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. पवन सिंहच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
पवन सिंह हा हिंदी (Hindi) आणि तामिळ (Tamil) मालिकांमध्ये काम करणारा लोकप्रिय अभिनेता आहे. पवन हा मुळचा कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यात राहणारा आहे. पण कामानिमित्ताने तो मुंबईत (Mumbai) राहत असे. मीडिया रिपोर्टनुसार, पवनचा मृतदेह आता मुंबईहून त्याच्या मूळ गावी मांड्या येथे नेण्यात येणार आहे. तिथेच त्याचे कुटुंबीय त्याच्यावर अंतिम संस्कार करतील.
Age 25
Sudden Death!!!
#heartattacksOk, we know the reason.https://t.co/I3ISpr3A9x
— manas basu (@manasba35920492) August 18, 2023
पवनच्या निधनाने त्याच्या कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर मांड्या येथील एचटी मंजू, केबी चंद्रशेखर, नारायण गौडा, बी प्रकाश, बीएल देवराजू, बुकानाकेरे विजया रामेगौडा, बी नागेंद्र कुमार, अक्कीहेब्बालू रघू, कुरुबाहल्ली नागेशसह अनेक नेत्यांनी अभिनेत्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
पवन सिंहचे 18 ऑगस्टला निधन झाले आहे. अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. अद्याप हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्या मृत्यू झाला आहे की दुसरे काही कारण होते याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पवनने अनेक लोकप्रिय तामिळ आणि हिंदी मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे.
पवन सिंहआधी अनेक कलाकारांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता विजय राघवेंद्र यांची पत्नी स्पंदना सुट्टीसाठी थायलंडला गेले होते. त्यावेळी तिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिच्या निधनाहेही कन्नड सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता.
संबंधित बातम्या
Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत, मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर
.
[ad_2]
Source link