[ad_1]
राज्यात येणारे अनेक उद्योग ऐनवेळी परराज्यात गेलेत. या संदर्भात याच अधिवेशनात श्वेतपत्रिका सादर करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गेल्या आठवड्यात सभागृहात दिली होती. आता अधिवेशन संपायला केवळ दोन दिवस शिल्लक असताना उद्योगांसंदर्भातील श्वेतपत्रिका केव्हा सादर होणार, असा प्रश्न विचारला जातोय. विशेष म्हणजे या संदर्भात वर्षभरापासून शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप होतायत. आणि उद्योग परराज्यात का गेले, या संदर्भात श्वेतपत्रिका सादर करणार, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वारंवार केली होती. प्रत्यक्षात श्वेतपत्रिका सादर झालेली नाही.
[ad_2]
source