Urvashi Rautela With Surya Kumar Yadav Latest Global Brand Ambassadors Of Leading Brand Video Goes Viral Know In Detail About The Viral Video Marathi News

Urvashi Rautela With Surya Kumar Yadav Latest Global Brand Ambassadors Of Leading Brand Video Goes Viral Know In Detail About The Viral Video Marathi News

[ad_1]

Urvashi Rautela With Surya Kumar Yadav : बाॅलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडत असतात ज्याची चर्चा संपूर्ण सोशल मीडीयावर होत असते. गेल्या काही काळापासून ती क्रिकेटमुळे चर्चेत होती. उर्वशी आणि टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर, फलंदाज ऋषभ पंत यांच्यातील वाद तर सर्वांनाच चांगलाच माहित आहे. आता पुन्हा एकदा उर्वशी भारतीय क्रिकेट संघाच्या आणखी एका खेळाडूसोबत दिसून आली आहे. मात्र तो ऋषभ पंत नसून क्रिकेटर सूर्यकुमार यादवसोबत आहे. या संबंधित व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दोघेही लवकरच ब्रँड एंडोर्समेंट आणि पार्टनरशिपसाठी एकत्र काम करणार आहेत. 

उर्वशी रौतेला आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप प्रसिद्ध आहे. सूर्यकुमार यादव हा देखील भारतीय क्रिकेट टीमचा लोकप्रिय खेळाडू आहे. एका आंतरराष्ट्रीय फॅशन आणि लाइफस्टाइल ब्रँडने या दोघांची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. ही जोडी लोकांकरता फार नवीन आहे. त्यामुळे अनेकांची उत्सुकता आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दोघांचेही फॅनबेस चांगलेच जास्त आहेत. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात सूर्याचा स्टायलिश लूक दिसतोय. ब्रँडच्या ब्लॅक हुडीमध्ये सूर्या डॅशिंग दिसतोय तर उर्वशीही तिच्या सौदर्यांने सर्वांना घायाळ करत आहे.

मॉडेल आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची शान वाढवत आहे. फॅशन आणि स्टाइलच्या बाबतीतही ती कुणापेक्षा कमी नाही. उर्वशीच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती लवकरच बॉलीवूडच्या दिवंगत प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ मध्ये रणदीप हुड्डासोबत देखील ती दिसली. त्याचबरोबर उर्वशी थ्रिलर सिनेमा ‘ब्लॅक रोज’ मध्ये मध्यवर्ती भूमिका निभावणार आहे. साऊथचा ‘थिरुट्टू पायले २’ च्या हिंदी रीमेकमध्ये देखील ती काम करताना दिसणार आहे. उर्वशी रौतेलाने आजपर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. ‘सिंह साब द ग्रेट’ या सिनेमाच्या माध्यमातून 2013 साली तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘सनम रे’, ‘ग्रेट ग्रॅंड मस्ती’, ‘हेट स्टेरी 4’ आणि ‘पागलपंती’ या सिनेमांत तिने काम केलं. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Pankaj Tripathi Father Death : पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन; 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *