[ad_1]
आता टोल टॅक्सवर खर्च होणारा वेळ आणखी कमी होणार आहे. सरकार लवकरच याबाबतची नवी सुविधा कार्यान्वीत करणार आहे. नवीन योजना आल्यावर वाहनचालकांना अर्धा मिनिटही टोल नाक्यावर उभे राहावे लागणार नाही असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. देशातील रस्त्यांवर निश्चित केलेल्या प्रवास अंतराच्या आधारे टोल भरण्याची व्यवस्थाही लागू केली जाईल. टोलवसुलीची नवी यंत्रणा कार्यान्वित झाल्यास तिची कार्यक्षमता वाढेल आणि प्रवासाचा वेळही कमी होईल असही सरकारकडून सांगण्यात येतय. वाहनांवर फास्ट टॅग लावल्यामुळे टोल बुथवर लागणारा वेळ ४७ सेकंदांवर आला आहे. परंतु, तो वेळ ३० सेकंदांवर आणण्याचा सरकारचा विचार आहे.
[ad_2]
source