Virat Kohli IPL 2024: Virat Kohli reaction about his hug with Naveen Ul haq and Gautam Gambhir

[ad_1]

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली हा इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील महान खेळाडू तर आहे. पण अनेकदा कोहली वादामुळे कायम चर्चेत असतो. भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर आणि अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन-उल-हकसोबतचा कोहलीचा मैदानावरील वाद क्रिकेट जगतात कोणापासूनही लपलेले नाहीत. या वादावर आता विराट कोहलीने एका कार्यक्रमात भाष्य केलं आहे. 

“माझ्या वागण्याने लोक निराश होऊ लागले आहेत. मी आणि नवीने आधी मिठी मारली, त्यादिवशी गौतम गंभीर भाईनेही मला मिठी मारली. त्यामुळे तुमचा मसाला संपला,” असं विराट कोहली मीडियाला उद्देशून म्हणाला. 

नेमकं प्रकरण काय?

गेल्या वर्षी आयपीएलमध्ये विराट कोहली आणि नवीन-उल-हकच्या मुद्द्याने बरेच लक्ष वेधले होते, परंतु 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकादरम्यान दोघांनी एकमेकांना मिठी मारून आपसातील मतभेद संपवले. दुसरीकडे, आयपीएल 2024 मध्ये आरसीबी विरुद्ध एलएसजी सामन्यानंतर गौतम गंभीरने विराट कोहलीला मिठी मारली, त्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्या सामन्यात लखनौने 28 धावांनी विजय मिळवला होता.

गंभीरने विराट कोहलीची भेट घेऊन मिठी का मारली?

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने कोहली आणि गंभीरच्या भेटीमागील महत्वाची माहिती सांगितली आहे. गौतम गंभीर सिनियर आहे. त्यामुळे गंभीरनेच कोहलीच्या भेटीसाठी पुढाकार घेतला. कधी कधी तुम्ही रेषा ओलांडता. पण गोष्टी निघून गेल्यावर, जेव्हा तुम्ही भविष्यात भेटता किंवा तुम्ही आता भेटता, तेव्हा दोघांमध्ये चांगल्याप्रकारे भेट होते, असं इरफान पठाणने स्टार स्पोट्सवर बोलताना सांगितले.

नवीन उल-हक काय म्हणाला?

काही काळापूर्वी नवीननेही विराटसोबतच्या मतभेदावर वक्तव्य केले होते आणि म्हटले होते की, “त्याने मला त्याच्यासोबतचे मतभेद संपवण्यास सांगितले. मीही म्हटले की चला हा वाद संपवू या. आम्ही हसलो, मिठी मारली आणि पुढे निघालो.” असेही तो म्हणाला होता. आतापासून तुम्हाला माझे नाव ऐकू येणार नाही पण प्रेक्षकांचा ओरडण्याचा आवाज ऐकू येईल,” असं नवीन उल हक म्हणाला. 

संबंधित बातम्या:

आरसीबीच्या अडचणी वाढल्या, मुंबईला मोठा फायदा; पाहा आयपीएलचे Latest Points Table

रोहित शर्मासोबत मस्ती करताना दिसला विराट कोहली; मैदानात नेमकं काय घडलं?, पाहा Video

MI vs RCB IPL 2024: आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई, मैदानात कोहलीला बॉलिंग देण्याची मागणी, विराटच्या रिॲक्शनची चर्चा

अधिक पाहा..



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *