Vivek Agnihotri On The Kashmir Files The Kashmir Files Unreported Vivek Agnihotri Upcoming Project The Vaccine War Know Details

[ad_1]

Vivek Agnihotri Became Bankrupt : सिने-निर्माता विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. 15 ते 25 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 3.55 कोटी रुपयांची कमाई केली. तर भारतात या सिनेमाने 250 कोटींपेक्षा अधिक कमाई केली.

‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाच्या माध्यमातून चांगले पैसे कमावल्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की,’द कश्मीर फाइल्स’ या सिनेमाच्या माध्यमातून मिळालेले पैसे पुढच्या सिनेमाच्या निर्मितीसाठी खर्च झाले आहेत. त्यामुळे आता तिसरा सिनेमा बनवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे.

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की,”मी जे काही पैसे कमावले, ते मी माझ्या पुढच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ या सिनेमावर खर्च केले आहेत. त्यामुळे सिनेमाच्या दणदणीत कमाईचा मला फारसा फायदा झालेला नाही. 

‘द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ प्रेक्षकांच्या भेटीला!

विवेक अग्निहोत्रींची ‘द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ ही सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सात भागांची ही सीरिज प्रेक्षक झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. अग्निहोत्री यांचा काश्मिर फाईल्स हा सिनेमा 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात काश्मिरी पंडितांचे स्थलांतर, त्यांना करावा लागलेला संघर्ष आणि त्यांच्या वाटेला आलेला अपमान याविषयीचे विदारक चित्रण करण्यात आले होते. देशभरातून काश्मिर फाईल्सला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यावरुनही वादही तेवढ्याच प्रमाणात झाला होता. सध्या ‘द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ ही सीरिज चर्चेत आहे.


‘द वॅक्सीन वॉर’ 15 ऑगस्टला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

विवेक अग्निहोत्रीचा ‘द वॅक्सीन वॉर’ हा सिनेमा 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताने लढलेल्या युद्धाची एक अविश्वसनीय कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. 11 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी गौडा ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Vivek Agnihotri : ‘द कश्मीर फाइल्स’नंतर आता विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; ‘द कश्मीर फाइल्स’चा पुढील भाग लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *