Whatsapp Working On New Feature Multi Acoount Feature You Can Now Use 2 Accounts In One App Know In Detail About Feature Marathi News

[ad_1]

WhatsApp Multi Account Feature : लवकरच तुम्हाला व्हॉट्सअॅपमध्ये मल्टीअकाउंट फीचर मिळेल, त्यानंतर एकाच अॅपमध्ये अनेक खाती उघडली जातील. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात जाण्यासाठी, तुम्हाला ते फक्त स्विच करावे लागेल. इन्स्टाग्राममध्ये मेटाने या प्रकारची सुविधा आधीच दिली आहे. 

सध्या हे फीचर काही बीटा टेस्टर्ससाठी रीलिज करण्यात आले आहे. आगामी काळात, कंपनी ते सर्वांसाठी रोलआउट करेल. तुम्हालाही व्हॉट्सअॅपचे सर्व नवीन फीचर्स आधी मिळवायचे असतील, तर त्यासाठी तुम्हाला कंपनीच्या बीटा प्रोग्रामसाठी नावनोंदणी करावी लागेल. नवीन खाते जोडण्यासाठी, तुम्हाला सेटिंग्जमध्ये जावे लागेल आणि QR कोड बटणाच्या पुढील बाण चिन्हावर टॅप करावे लागेल. येथून तुम्ही खाते जोडण्यास सक्षम असाल. एकदा खाते जोडले गेले की, तुम्ही त्यातून लॉग आउट करेपर्यंत ते तुमच्या डिव्हाइसवर लॉग इन राहिल. म्हणजेच, जेव्हा तुम्ही अकाउंट स्विच करता तेव्हा तुम्हाला पुन्हा पुन्हा लॉग इन करण्याची गरज भासणार नाही.

काय आहेत या फिचरचे फायदे?

या फिचरद्वारे तुमची प्रायव्हसी नियंत्रणात राहू शकते. जे लोक एकपेक्षा जास्त अकाउंट वापरतात त्या लोकांकरता हे फिचर उपयुक्त ठरणार आहे. 

WhatsApp या फिचरवर करत आहे काम

WhatsApp अनेक फिचरवर काम करत आहे. त्यामध्ये  यूजरनेम, अॅडमिन रीव्ह्यू, Passkey, ईमेल लिंक इत्यादीचा समावेश आहे. युजरनेम फीचर सुरू केल्यानंतर, प्रत्येकाला स्वतःचे वेगळे युजरनेम सेट करावे लागेल, जसे सध्या इंस्टाग्राम आणि ट्विटरमध्ये आहे. युजरनेमच्या मदतीने तुम्ही इतरांना ही तुमच्या व्हॉट्सअॅपवर जोडू शकता. म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा इतरांना नंबर देण्याची गरज नाही. WhatsApp व्यतिरिक्त, Meta ने थ्रेड्ससाठी नवीन अपडेट्स देखील लागू केले आहेत. लवकरच कंपनी UserRem फीचर आणू शकते. तर  काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने स्क्रीन शेअर फीचर अपडेट केले होते. या फीचर मदतीने एकाच वेळी अनेक लोकांना स्क्रिन शेअर करता येणार होती. आता आणखीन एक अनोखे फिचर व्हॉट्सअॅप  वापरकर्त्यांकरता अपडेट करण्यात आले आहे. जे वापरकर्त्यांना ग्रुप कॉल शेड्युल करण्यास मदत करणार आहे. हे फीचर वापरकर्त्यांना अपकमिंग ग्रुप कॉल इव्हेंटबद्दल सर्व मेंबर्सना अलर्ट करते. 

नोव्हेंबर 2016 मध्ये व्हिडीओ कॉलिंग सुरू झाले

व्हिडीओ कॉलिंग हे WhatsApp वर गेल्या सहा वर्षांहून म्हणजेच नोव्हेंबर 2016 पासून अपडेटेड आहे. अलीकडच्या काळात व्हॉट्सअॅप सतत नवनवीन फीचर्स जोडत आहे. आपली सेवा अधिक सुधारत आहे. कंपनीने अलीकडेच WhatsApp iOS वर व्हिडीओ कॉलसाठी पिक्चर-इन-पिक्चर सपोर्ट आणलं आहे. 

संबंधित बातमी 

Dating Apps Fraud : डेटिंग अॅप्स वापरणाऱ्यांना सरकारने दिला सावधानतेचा इशारा; जाणून घ्या काय आहे प्रकरण

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *