Yuvraj Singh Baby Yuvraj Singh Wife Hazel Keech Welcome Their Second Baby Aura See Photo Yuvraj Singh Shared Post On Social Media

[ad_1]

Yuvraj Singh Hazel Keech Welcome Second Child : क्रिकेटपटू युवराज सिंह (Yuvraj Singh) सध्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या एका गोड गोष्टीमुळे चर्चेत आहे. युवराज दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. युवराजची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचने (Hezel Keech) एका गोड मुलीला जन्म दिला आहे. 

युवराजला लेकीचं नाव ‘ऑरा’

युवराजने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. पोस्ट शेअर करत त्याने लाडक्या राजकुमारीची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने आपल्या लेकीचं नाव ‘ऑरा’ (Aura) असं ठेवलं आहे. युवराजने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”ऑराच्या येण्याने आमचं कुटुंब पूर्ण झालं आहे”. ‘ऑरा’चा अर्थ वाऱ्याची झुळूक असा आहे. 

युवराजची पोस्ट आणि त्याने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते आणि सेलिब्रिटी कमेंट्स करत खेळाडूचं आणि अभिनेत्रीचं अभिनंदन करत आहेत. हरभजन सिंह, ऋचा चड्ढा, अंगद बेदी, तनिषा मुखर्जीसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत दोघांचं अभिनंदन केलं आहे.


क्रिकेटर युवराज सिंह 2016 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल हेजल कीचसोबत लग्नबंधनात अडकला. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. युवराज आणि हेजल 30 नोव्हेंबर 2016 मध्ये लग्नबंधनात अडकले. कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यानंतर 25 जानेवारी 2022 रोजी त्यांना पहिला मुलगा झाला. युवाराज आणि हेजलच्या लाडक्या लेकाचं नाव ओपियन कीच सिंह आहे. 

हेजल कीचच्या सिनेमांबद्दल जाणून घ्या… (Hezel Keech Movies)

हेजलने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. त्यानंतर ती सलमान खाच्या ‘बिग बॉस 7’मध्ये (Bigg Boss 7) सहभागी झाली. 2007 मध्ये तिने ‘बिल्ला’ या तामिळ सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ सिनेमात तिने साकारलेली ‘माया कपूर’ची भूमिका चांगलीच गाजली. या सिनेमाने ती रातोरात लोकप्रिय झाली. अभिनयासह तिने मॉडेलिंग क्षेत्रातही चांगलं नाव कमावलं आहे.

संबंधित बातम्या

Hazel Keech : पत्नी हेजलच्या वाढदिवसाला युवीने दिलं खास गिफ्ट; सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *